02:29pm | Aug 02, 2018 |
सातारा : गावपातळीवरील विकास सेवा सोसायट्या या त्या- त्या गावाच्या विकासाचा कणा आहेत. गावातील शेतकर्यांचे जीवनमान उंचावणार्या विकाससेवा सोसायटी ही गावपातळीवरील अर्थवाहिनी असून या सोसायटीच्या माध्यमातून ग्रामस्थ, शेतकर्यांचे आर्थिक सबलकिरण करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
केळघर ता. जावली येथील विकाससेवा सोसायटीच्या चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी बाजीराव पार्टे तर, व्हा. चेअरमनपदी नारायण जाधव यांची निवड करण्यात अली. निवडीनंतर दोघांचाही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी ज्ञानदेव रांजणे, सौ. निर्मला दुधाणे, मावळते चेअरमन दिलीप पाटील, व्हा. चेअरमन सिताराम कांबळे, सचिव आनंदा शेलार, संचालक बबन बेलोशे, शंकर शेलार, हरिभाऊ शेलार, नारायण पार्टे, सिताराम पाटणे, श्रीरंग सुर्वे, राघव बिरामणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, मोठ्या विश्वासाने ग्रामस्थ, सभासदांनी सोसायटीची सत्ता तुमच्या हाती दिली आहे. तसेच सदस्यांनी तुम्हाला चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदावर काम करण्याची संधी दिली आहे. सर्वांनी एकोप्याने सभासद, शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेवून सोसायटीच्या विविध योजनांचा लाभ शेतकर्यांना द्यावा. सोसायटीच्या माध्यमातून सभासद शेतकर्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि संचालकांनी कटीबध्द रहावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.
निवडीबद्दल पार्टे व जाधव यांचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना रांजणे, ज्ञानदेव रांजणे, रामभाऊ शेलार यांच्यासह विविध पदाधिकार्यांनी अभिनंदन केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |