01:47am | Jan 12, 2020 |
सातारा : सेवा हमी कायदा 2015 अंर्तगत राज्यात आजतागायत एकही कारवाई झाली नाही. महिला बालकल्याण शिक्षण कोणत्याही प्रकरणाची फाईल सात दिवसाच्या आत निकाली निघाली नाही तर संबधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश महिला व बाल कल्याण तथा शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.
भागवत साहेब सेवा हमी कायद्याअंतर्गत आपण एक तरी कारवाई केली आहे काय ? बच्चू कडू यांच्या थेट प्रश्नाने मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांना मिनिटभर काही सुचलेच नाही. फायली विनाकारण अडवाल तर नोकरी गमवाल मंत्री महोदयांच्या थेट आदेशाने प्रशासनातल्या अनेकांची तंतरली. महिला बाल कल्याण, शालेय शिक्षण, पुनर्वसन व बाल विकास यांचा पुणे विभागातील पाच जिल्हयाचा सविस्तर आढावा बच्चू कडू यांनी शनिवारी सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेतला. डिजीटल डिसप्लेवर सर्व विभागाची माहिती मंत्री महोदयांना पुणे विभागाचे उपायुक्त दिलीप शिवराळे यांनी दिली.
तत्पूर्वी हलगी व डफाच्या कडकडाटात बच्चू कडू यांचे स्वागत करण्यात आले. पुणे जिल्हयातील दहा शासकीय संस्था व दत्तक योजना परिवास तसेच महिला व बाल कल्याण योजनांचा आढावा, पात्र लाभार्थी व अनुदान वाटप व शिल्लक निधी याची माहिती घेण्यात आली.
अंगणवाडी व आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून अनाथ या निकषात बसणाऱ्यांची अ ब क अशी स्वतंत्र वर्गवारी करून सर्व जणांची यादी बनवून लाभार्थी संख्या वाढवण्याचे आवाहन कडू यांनी केले .विधवा महिला, घटस्फोटीत महिला, व्यसनाधीन पतीच्या पत्नी, वीर पत्नी, शेती करणाऱ्या महिला व कुटुंबातील माहिती घेऊन लाभार्थी या निकषात बसवण्याचे प्रयत्न करा या कामात कसूर झाल्यास कठोर कारवाईचे संकेत राज्यमंत्र्यांनी दिले. जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने स्वतंत्र याद्या बनवण्याचे आदेश देण्यात आले. या योजनेचे तीन हजार लाभार्थी माझ्या जिल्हयात असताना साताऱ्यात मात्र तीनशेच लाभार्थी कसे काय ? असा प्रश्न कडू यांनी केल्यावर प्रशासन निरुत्तर झाले.
अनेक योजनांचा आढावा घेताना बच्चू कडू यांनी कागदपत्रांची अपूर्तता, निकषांच्या अडचणीची कारणे हे प्रकार अनुभवले त्यामुळे सेवा हमी कायदा 2015 च्या कायद्याची बच्चू कडू यांनी आठवण करून दिली. कोणत्याही योजनाची व पात्र लाभार्थी प्रकरणांची फाईल अधिकाऱ्यांनी सात दिवसापेक्षा अधिक काळ अडवल्यास त्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागेल असा कडक पवित्रा राज्यमंत्र्यांनी घेतला. शासनाच्या कल्याणकारी योजना तळागाळात पोहचत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली .भिक्षेकरी व अनाथ बालकांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा परिषद, बाजार समित्या स्थानिक स्वराज्य संस्था यांनी त्यांच्या बजेटच्या एक टक्के निधी राखीव ठेवण्याचे आदेश नामदार बच्चू कडू यांनी दिले.
बच्चू कडू यांच्या धारदार प्रशासनाचा व कर्तव्य कठोरतेचा अनुभव सातारा जिल्हा प्रशासनाने घेतला. फी साठी मुलांना परीक्षेला बसू न देणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचे आदेश बच्चू कडू यांनी दिले. प्रशासनातल्या अनेक त्रुटींवर राज्य मंत्र्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना थेट कानपिचक्या दिल्या. अपंग पुनर्वसन दाखल्यासाठी शंभर रूपयांचे प्रतिज्ञापत्र सक्तीचे होत असल्याची तक्रार झाल्याने राज्य मंत्र्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ आमोद गडीकर यांना सुनावले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |