11:24pm | May 23, 2018 |
महाबळेश्वर : महाबळेश्वरचे आल्हाददायक व प्रसन्न वातावरण त्यातच मनाला आनंद देणारा व या भागातील फुले, पाने, पक्षी, निसर्ग याची माहिती देणारा हा फुलोत्सव आहे. पर्यटनवृद्धी साठी असे पुष्पोत्सव फार उपयोगी असतात. याचा लाभ स्थानिकांसह या काळात येथे येणाऱ्या पर्यटकांना निश्चितच होईल अश्या शुभेच्छा दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ.डी.वाय.चंद्रचूड यांनी दिल्या.
येथील सह्याद्री ट्रेकर्स आणि एडव्हेन्चर व महाबळेश्वरातील निसर्गप्रेमी यांच्या वतीने “महाबळेश्वर पुष्पोत्सव २०१८ ”चे आयोजन येथील शेठ गंगाधर माखारीया उद्यानात केले होते .त्याचा उद्घाटन सोहळा दिल्ली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डॉ.डी.वाय.चंद्रचूड यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी पुष्पोत्सव पाहिल्यानंतर न्यायमूर्ती डॉ. चंद्रचूड यांनी वरील शुभेच्छा दिल्या. यावेळी महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर, महाबळेश्वरच्या सामाजिक कार्यकर्त्या व शिवसेना महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा सौ.लीलाताई शिंदे, सौ.सुलोचना बावळेकर, फ्लावरशो चे आयोजक व येथील सह्याद्री ट्रेकर्स आणि एडव्हेन्चरचे संस्थापक संजय पारठे, हॉटेल उद्योजिका सौ.शोभा महाबळेश्वरवाला, माजी उपनगराध्यक्ष व माळी संघटना अध्यक्ष लक्ष्मण कोंडाळकर, महाबळेश्वर तालुका वकील संघ अध्यक्ष विजयकुमार दस्तुरे, तहसीलदार रमेश शेंडगे, माळी संघटना पदाधिकारी सुधाकर जाधव, वसंत मोरे, संदीप मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
तीन दिवसीय या पुष्पोत्सवाचा लाभ स्थानिक नागरिक, महिला, शालेय विध्यार्थी- विध्यार्थिनी, पर्यटक यांनी मोठ्या प्रमाणावर घेतला. पुष्पोत्सवामध्ये येथील ग्रीनवूड बंगला (पिरामलग्रुप ), हॉटेल दिना , हॉटेल गौतम, हॉटेल श्रेयस, सुलोचना राजभुवन बंगला, आस्पेक्ट हॉल बंगला, कदम नर्सरी, दि क्लब, महाबळेश्वर, नं.पा. माखरिया गार्डन, महाबळेश्वर वनविभाग, सौ. दिपाली पाटणे, कु.वर्षा पारठे आदींनी सहभाग घेऊन विविध प्रकारच्या शोभिवंत फुल झाडांच्या कुंड्या अत्यंत आकर्षकपणे मांडल्या होत्या.
पुष्पोत्सव २०१८ यशस्वी करण्यासाठी संजय भोसले, विजय केळगणे, अक्षय कांबळे, किसन बावळेकर, दिपक जाधव, अक्षय शेलार, सुनील जाधव, किरण चव्हाण आदींनी फार परिश्रम घेतले .
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |