05:49pm | Apr 22, 2018 |
सातारा : व्यसनमुक्त संघाचे विलासबाबा जवळ यांनी मेढा तालुक्यातील अवैध दारुविक्रेत्यांवर जरब बसविण्यासाठी एल्गार पुकारलेला आहे. जिल्ह्यातील संवेदनशील गाव म्हणून ओळखल्या जाणार्या मेढ्यात व जावली तालुक्यात दारुबंदी आहे. परंतू या बंदीचा नेमका उलटा इफेक्ट जावली तालुक्यात दिसत आहे. पोलिसांनी कितीही कारवाया केल्या तरी हा दारुचा महापूर बंद होण्याऐवजी वाढतच चाललेला आहे.
सुमारे दीड दशकापूर्वी व्यसनमुक्त संघाचे विलासबाबा जवळ यांच्या पुढाकाराने जावली तालुक्यातील महिलांनी अथक संघर्ष करुन जावली तालुक्यात उभी बाटली आडवी केली होती. हे व्यसनमुक्त संघाचे आणि जावली तालुक्यातील महिलांचे मोठे यश होते. जावली तालुक्यातील रणरागिनींनी आपला संसार सुखात चालावा यासाठी उभी बाटली आडवी केली. परंतू यावरही उतारा काढून जावली तालुक्यातील काही महाभाग अवैध दारुविक्री करुन ‘रईस’ झाले. त्यापैकीच एक म्हणजे कुडाळचा अवैध दारुविक्रीतून गब्बर झालेला दीपक वारागडे याने कोट्यवधींची माया कमविलेली आहे. कुडाळचा दीपक आणि सरताळेचा भिसे यांनी अवैध दारुचा जावली तालुक्यात पूर आणलेला आहे. पन्नास रुपयांची बाटली ऐंशी किंवा शंभर रुपयांना विकून शेतात राबून मोलमजुरी करणार्यांची आर्थिक लूट करुन तसेच त्यांना देशोधडीला लावून हे दोघे जावली तालुकाच विकत घेतल्याची भाषा करीत आहेत. जावली तालुक्यातील कुडाळ, सरताळे, आनेवाडी, सायगाव, रायगाव, हुमगाव, म्हसवे, गांजे, कुसूंबी, खर्शी, बारामुरे, करहर, सोनगाव तर्फ या गावांसह जावली तालुक्यातील दुर्गम भागातील गावांमध्ये आज राजरोसपणे अवैध दारुविक्री केली जात आहे.
गेल्या दोन वर्षात जावली पोलिसांनी कधी नव्हे अशा रेकॉर्डब्रेक अवैध दारुविक्री प्रकरणी कारवाया केल्या, परंतू हे दारुविक्रेते पोलिसांनाही पुरुन उरले आहेत. 2017 साली जावली पोलिसांनी अवैध दारुविक्री प्रकरणी 41 कारवाया केल्या. यामधील 48 आरोपींना बेड्या ठोकल्या, तर 12 लाख 99 हजार 962 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या चालू वर्षात पोलिसांनी आतापर्यंत 10 कारवाया केल्या आहेत. यामध्ये 15 आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून सुमारे 5 लाख 28 हजार 594 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पोलिसांनी अपुरे मनुष्यबळ असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाया करुनही राजकीय वरदहस्तामुळे कुडाळचा दीपक वारागडे व सरताळेचा भिसे हे दोघे आजही रोज लाखो रुपयांची माया अवैध दारुविक्रीतून कमवित आहेत. पोलिसांनी आतापर्यंत या दोघांसह शेकडो लोकांवर अवैध दारुविक्री प्रकरणी कारवाया केल्या आहेत, परंतू राजकीय वरदहस्तामुळे या द्वयींनी पोलिसांवरच गंभीर स्वरुपाचे आरोप करुन पोलिसांनाच आरोपीच्या पिंजर्यात उभे केलेले आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गडचिरोली दारुबंदी पॅटर्न राबवून या दोन्ही ‘नगांना’ आपला हिसका दाखवावा, तसेच दीपक वारागडे व भिसे यांना पाठिशी घालणार्या पुढार्यांचीही पाळेमुळे खणून काढून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, तरच या दोघांना लगाम लागणार आहे. मेढा पोलीस ठाण्यात अपुरे मनुष्यबळ आणि कार्यक्षेत्र मोठे असल्यामुळे अशा अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मोठी दमछाक होते.
जावली तालुक्यामध्ये दारु निर्मिती होत नाही, येथे विक्री केली जाणारी दारु ही अवैध पद्धतीने सातारा, पाचगणी, वाई, बावधन, जांब, वाठार स्टेशन, महाबळेश्वर याठिकाणी असलेल्या परवानाधारक दारुविक्रेत्यांकडून आणली जाते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अशा परवानाधारक दुकानांतून अवैध दारु पुरवठा केल्याचे आढळून येवूनही त्यांच्यावर कारवाई करण्याचे अद्यापपर्यंत स्वारस्य दाखविलेले नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी परवानाधारक दारु दुकानांच्या आसपास साध्या वेषातील पोलीस कर्मचारी नेमूण दुकानातून दारुचे बॉक्सच्या बॉक्स घेवून जाणार्यांवर कारवाई केली तर हा प्रश्न निकाली निघणार आहे. बाकी कुडाळचा रईस दीपक वारागडे व सरताळेचा भिसे या दोघांची वरात काढून यांच्या नांग्या ठेचल्या तरच हे नग जागेवर येणार आहेत. त्यांच्यावर लवकरात लवकर तडीपारीची कारवाई करुन त्यांना जिल्ह्यातून हद्दपार केले तरच जावली तालुका दारुमुक्त होण्यास काही अंशी मदत होणार आहे.
लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांकडून अभय :
जावली तालुक्यामध्ये काही गावांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी व विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून ग्रामपंचायतींच्या विकासकामांसाठी अवैध दारुविक्रेत्यांकडून लाखो रुपयांचा निधी घेण्यात येतो. त्या बदल्यात त्या दारुविक्रेत्यांना संबंधित लोकप्रतिनिधींकडून ‘संरक्षण’ दिले जाते. काही राजकीय नेत्यांचे वाढदिवस, निवडणुकांमधील जेवणावळी, डिजिटल बॅनर्स या अवैध दारुविक्री करणार्यांच्या पैशामधूनच ‘मॅनेज’ केले जातात. मेढा नगरपंचायतीमध्ये एका नगरसेवकाला या अवैध दारुविक्री करणार्यांनीच निवडून आणलेले आहे. त्यामुळे अशा व्हाईट कॉलर लोकप्रतिनिधींकडूनच पोलीस कारवाईमध्ये हस्तक्षेप करुन दबावतंत्र वापरले गेल्यामुळे अनेकवेळा पोलिसांना कारवाई करताना दबाव आणला जातो.
पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण :
गेल्यावर्षी मेढा पोलीस ठाण्याचा कार्यभार स्विकारल्यानंतर सपोनि जीवन माने यांनी जावली तालुक्यातील अवैध दारुविक्री करणार्यांवर कारवाई करुन आपला हिसका दाखवला होता. परंतू मेढ्यातील एका फुटकळ शिवसैनिकाने आपले वाळूतील पाप लपविण्यासाठी दारु व्यावसायिकांना पुढे करुन त्यांच्यावरच पोलिस अधीक्षकांना कारवाई करण्यात यावी, असे निवेदन दिले होते. त्यावेळी त्या फुटकळ शिवसैनिकासोबत त्याची पत्नीही सहभागी झाली होती. जावली तालुक्यातील अनेक राजकीय पदाधिकारी आपले काळे धंदे लपविण्यासाठी पोलिसांना बॅकफुटवर ठेवण्यासाठी पोलिसांवरच अतिशय हीन दर्जाचे आरोप करुन आपली पोळी भाजतात. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अशा फुटकळ राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांना त्यांच्या औकातीमध्येच ठेवावे, अशी मागणी जावली तालुक्यात कार्यरत असणार्या पोलीस कर्मचार्यांनी केली आहे.
महसूल, दारुबंदी खाते आरोपीच्या पिंजर्यात :
2017 पासून मेढा पोलिसांनी दारु धंद्यांवर आसूड उगारुन आजपावेतो सुमारे 51 कारवाया केल्या. यामध्ये 18 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त करुन 63 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. परंतू याबाबत महत्त्वाची भूमिका बजावणारे सातारा येथील दारुबंदी खाते मात्र टार्गेट पूर्ण करण्यातच व्यस्त असून अवैध दारुविक्री प्रकरणात हप्ते खावून गप्प बसण्यातच धन्यता मानीत आहे. अवैध दारुविक्री करणारे वाई, सातारा, बावधन येथील वाईन शॉपमधून मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी दारु खरेदी करुन त्याची अवैध विक्री जावली तालुक्यात करीत आहेत. मात्र, दारुबंदी खात्याला या गोष्टीची साधी कुणकूणही नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महसूल विभागही अवैध दारुविक्री करणार्यांना तडीपार करण्याकरीता पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावावर तत्परतेने कार्यवाही करीत नसल्यामुळे या दोन्ही विभागांकडून पोलिसांना अपेक्षित सहकार्य मिळत नाही. त्यामुळेच जावली तालुक्यात अवैध दारुचा महापूर आलेला आहे. या दोन्ही विभागांच्या अनास्था जावली तालुक्यातील तरुण पिढीचे भविष्य बरबाद करीत आहे. त्यामुळे हे दोन्ही विभाग आता आरोपींच्या पिंजर्यात उभे आहेत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |