12:51am | Sep 12, 2019 |
फलटण : माजी खासदार लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर यांची स्वप्नपूर्ती आणि या भागातील लोकांनी गेल्या 23 वर्षापासून केलेल्या रेल्वेसेवा अपेक्षा पूर्तीचा हा क्षण असून त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितभई शहा, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेचे जनरल मॅनेजर ए.के.गुप्ता व त्यांचे सहकारी सर्व अधिकारी, कर्मचार्यांचे अनमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभल्याबद्दल गौरवपूर्ण शब्दात आभार व्यक्त करीत फलटणकरांची साथ लाभल्यानेच हे शक्य झाल्याचे सोलापूर रेल्वे विभाग अध्यक्ष खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान आज मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून फलटण-लोणंद रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
देशाचे लाडके पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी, गृहमंत्री ना. अमित शहा व मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केल्याने तुम्हाला मते मागायला आलो नाही. मात्र तुम्ही भरभरून मते देऊन मला निवडुन दिले,म्हणून तुमच्या हक्काचे नीरा देवधरचे पाणी तुम्हाला परत मिळवून दिले, रेल्वेचा प्रश्न आज मार्गी लावला, आणि आजच आत्ता मला निरोप दिला आहे की नाईकबोमवाडीची एमआयडीसी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली. यामुळे आज माझीच छाती 56 इंच झाली असल्याची भावना खा.रणजितसिंह यांनी बोलून दाखवली तर या पुढे जाऊन माढा लोकसभा मतदारसंघात या पुढे फक्त विकासाचेच राजकारण करणार असल्याचे खा.रणजितसिंह यांनी सांगितले. आपल्या वडीलांनी,
लोणंद-फलटण-बारामती या 64 कि.मी. रेल्वेमार्गापैकी 278 कोटी रुपये खर्च करुन लोणंद-फलटण रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर आज (बुधवार) या मार्गावर फलटण रेल्वे स्थानकावरुन हिरवा झेंडा दाखवून फलटण ते लोणंद रेल्वे सेवेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, कृषी पाणी पुरवठा राज्यमंत्री व सातारचे सहपालक मंत्री सदाभाऊ खोत, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे, धैर्यशील मोहिते पाटील, विश्वासराव भोसले, स्वराज संघटनेचे दिगंबर आगवणे, हणमंतराव मोहिते, डॉ. जे.टी.पोळ, जयकुमार शिंदे, अशोकराव जाधव, पुणे विभाग रेल्वे मंडल प्रबंधक मिलींद देवुस्कर व त्यांचे सहकारी अधिकारी आणि फलटण शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी या रेल्वे मार्गासाठी अथक मेहनत घेतली, आपल्या लोकसभा सदस्यत्वाच्या काळात लोकसभेतील प्रभावी भाषणाच्या माध्यमातून या रेल्वेमार्गाची आवश्यकता आणि उपयुक्तता पटवून देतानाच रेल्वेसाठी हा अत्यंत फायदेशीर मार्ग होणार असल्याचे पटवून दिल्यानंतर या रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतुद करण्यात आली त्यानंतर भूसंपादन व अन्य प्रक्रियेत हा रेल्वेमार्ग प्रलंबीत राहिला परंतू पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी स्वत: या प्रश्नात लक्ष घालुन संबंधीत विभागाला सूचना दिल्यानेच फलटणकरांच्या अपेक्षा पूर्ण होत असल्याचे स्पष्ट करीत लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी घेतलेली मेहनत, या कामासाठी त्यांची असलेली चिकाटी, तळमळ आणि प्रयत्नातून आज या मार्गावरुन रेल्वेसेवा सुरु झाल्याचे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
माढा लोकसभा मतदार संघातून मोठ्या अटीतटीच्या सामन्यात आपल्याला मोठ्या मताधिक्याने लोकसभेत पाठविण्यासाठी नेते, कार्यकर्ते आणि मतदारांनी दिलेला ठाम पाठींबा लक्षात घेवून निवडणूकीनंतर आपण प्रत्यक्ष लोकांच्या अपेक्षापूर्तीसाठी प्रयत्नशील राहिल्यानेच पहिल्या 100 दिवसात 300 कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण करण्यात आपण यशस्वी झालो असून त्यामध्ये शिरवळ-लोणंद रस्त्याची दुरुस्ती, फलटण-दहिवडी-म्हसवड रस्ता, नीरा-देवघरचे हक्काचे पाणी लाभक्षेत्राबाहेर न देण्यासाठी दिलेल्या लढ्याद्वारे पाणी या तालुक्याला मिळवून देण्यात आणि रेल्वेसेवा सुरु करण्यात आपण यशस्वी झाल्याचे नमूद करीत फलटणकरांना मते मागण्यासाठी आलो नाही तरीही भरघोस मतदान करुन आपल्या विजयासाठी दिलेल्या पाठींब्याची परतफेड आगामी 5 वर्षात या तालुक्याचा सर्वांगीण विकास साधून करण्याची ग्वाही यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |