03:47pm | Jan 23, 2020 |
सातारा : सातार्यातील जिल्हा क्रिडा संकुलाच्या जवळ असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस (भू विकास बँक) चौकाला सुमारे दोन वर्षानंतर झळाळी मिळत आहे. असून मॅरेथॉन असोसिएशनला केवळ विरोध म्हणून काहींनी केलेल्या कुरघोड्यांमुळे सुमारे दोन वर्षानंतर पालिकेला जाग आली असून नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीचे औचित्य साधून पालिकेने या चौकाला रंगरंगोटी करुन आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम केले आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे काम वादातीत आहे. ब्रिटीशांबरोबर सशस्त्र लढा उभारुन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटीश सरकारला हादरवून सोडले होते. याच आझाद हिंद सेनेत सातार्यातीलही अनेकजण सहभागी होते. नेताजींच्या चिरंतन स्मृती तेवत ठेवण्यासाठी आझाद हिंद सेनेतील त्यांच्या सहकार्यांच्या व तत्कालीन सामाजिक कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे व पाठपुराव्यामुळे सातार्यातील करंजे भागात सातारा पालिकेने सुभाषचंद्र बोस यांचे स्मारक उभारले आहे. त्याची डागडुजी सातारा पालिकाच करीत असते. या स्मारकासमोर स्मारकाच्या अगोदरपासून भू विकास बँकेची वास्तु होती. त्यामुळे स्मारकासमोरील चौकाला भू विकास बँक चौक म्हणूनच ओळखले जात असे. वास्तविक सातारा पालिकेचा 1985 साली या चौकाच्या नामकरणाचा ठराव झाला होता. परंतू पालिकेला या चौकाच्या ठिकाणी चौकाची साधी पाटीही लावता आली नव्हती. त्यामुळेच या चौकाला भू विकास बँक चौक म्हणूनच ओळखले जायचे.
सुमारे दोन वर्षापूर्वी मॅरेथॉन असोसिएशन सातारा (सातारा रनर्स फौंडेशन)ने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेवून या चौकात शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आयलँड उभारले होते. सातारकरांमध्ये आरोग्याविषयी सजगता यावी यासाठी या चौकात या आयलँडच्या बाजूला एका कुटूंबाचे धावतानाचे लोहशिल्प उभारले होते. पूर्वी हा चौक 'बकाल' चौक म्हणून ओळखला जायचा. परंतू मॅरेथॉन असोसिएशनने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने लाखो रुपये खर्च करुन अतिशय देखणा असा आयलँड याठिकाणी तयार केला होता. मात्र, सातार्यातील काही नतद्रष्टांनी एकत्र येवून या आर्यलँडच्या उद्घाटनादिवशीच ठेवणीतल्या शिव्यांसह या चौकात बोरीचा बार उडवला होता. नसती झंझट नको म्हणून मॅरेथॉन असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी लाखो रुपये खर्च करुन बांधलेला आयलँड सातारकरांना अर्पण केला होता व स्वखर्चातूनच त्या आयलँडवर इतिहासात पहिल्यांदाच नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाची पाटीही लावून दिली होती. त्या दिवशी सातारकरांना या चौकाचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस चौक असल्याचे माहित झाले होते. त्यानंतर आयलँडवर लावलेल्या लॉनवर सातारा पालिकेसह मॅरेथॉन असोसिएशनला विरोध करणार्या एकाही पंटरने साधे पाणी मारण्याचे कष्ट घेतले नाहीत. पावसाळ्यात याच आयलँडवर कंबरेएवढे गवत वाढले. भटकी जनावरे आणि कुत्र्यांचा हा आयलँड हक्काचा निवारा झाला. दोन वर्षात या आयलँडची दैना झाली. उन्हामुळे आणि पावसामुळे या आयलँडच्या डिजिटल पाटीवरील नेताजी सुभाषचंद्र बोस हे नावही लुप्त झाले. गेल्या वर्षी 23 जानेवारीला नेताजींच्या जयंतीदिनी या आयलँडला विरोध करणार्या एकाही माईच्या लालाने या फलकाला साधा हारही घातला नाही. अखेर दोन वर्षानंतर पालिकेला उपरती झाली आहे. सातारा मॅरेथॉन असोसिएशनने उभारलेल्या आयलँडवर मार्बलच्या दोन पाट्या लावून त्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस चौक लिहून अखेर त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दुँगा’ असा नारा देवून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतलेल्या नेताजींच्या चौकाला दोन वर्षानंतर का होईना मॅरेथॉन असोसिएशनने उभ्या केलेल्या आयलँडवर सातारा पालिकेने आयत्या पिठावर रेघोट्या ओढत त्यांच्या जयंतीदिनी त्यांना न्याय देण्याचे काम केलेले आहे.
पुढे पाठ, मागे सपाट
सातार्यातील स्मारके आणि चौकांची सातारा पालिकेच्या दुर्लक्षामुळे बकाल अवस्था झालेली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातील हुतात्मा स्मारक तर रोज रात्री तळीरामांचा अड्डा झालेला आहे. सातारा शहरात अतिक्रमण केलेले हातगाडे आणि इतर सामग्रीही याच ठिकाणी सातारा पालिका आणून टाकते. त्यामुळे हे स्मारक न होता सातारा पालिकेची अडगळ टाकण्याची जागा झाली आहे. त्यामुळे या स्मारकांचे पावित्र्य जपण्यासाठी याठिकाणी सातारा पालिकेला लक्ष द्यावे लागणार आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |