01:48am | Jan 12, 2019 |
सातारा : पन्नास वर्षांपूर्वी वालुथ ता. जावळी जि. सातारा या खेडेगावात जन्म घेतलेल्या दिवंगत ऍड. हरिभाऊ गोळे यांनी स्वकर्तुत्वाने मुबंई न्यायालयात आव्हान स्वीकारून वकिली केली. सामाजिक कार्य करीत सामान्य माणसाची सेवा करण्यासाठी त्यांनी न्यायाधीश पदाची संधी डावलली. आज वैदकीय क्षेत्रात कार्यरत राहून प्रतिथयश मिळवून सुध्दा डॉ. प्रतापराव गोळे व त्यांचे बंधू योगेश गोळे यांनी महाराष्ट्रात व्यसन मुक्तीचे कार्य करणारे जावळीचे सुपुत्र विलास बाबा जवळ यांना ऍड. गोळे स्मरणार्थ पहिला पुरस्कार तसेच पत्रकार भूषण पुरस्कार प्राप्त पत्रकार अजित जगताप यांचा गौरव केला. ऍड गोळे यांचा सामाजिक वारसा पुढे घेऊन जाण्यास त्यांची मुले डॉ. प्रतापराव गोळे व योगेश गोळे यशस्वी ठरले आहेत असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा येथे केले.
ऍड. गोळे यांच्या आठवणी निमित्त यंदापासून जावळीतील सुपुत्राने केलेल्या कार्याचा गौरव करण्याची सुरुवात केली आहे. त्याच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, अजिंक्यतारा साखर कारखाना चेअरमन सावंत, जेष्ठ मार्गदर्शक डी के जाधव, हिंदुराव तरडे, रवि परामणे, बुवासाहेब पिसाळ, सयाजी शिंदे, श्रीमती आशाताई कदम, ऍड. गोळे यांची पत्नी, सत्कारमूर्तीव डॉ रेवले, पत्रकार दत्ता पवार यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
सातारा-जावळी मतदारसंघ एकत्र झाला. त्यांनतर खऱ्या अर्थाने जावळीतील गुणवंत यांची भेट झाली. जावळी बँकेच्या रूपाने मुबंईत रोपटं लावण्याचे काम मान्यवरांसोबत ऍड गोळे यांनी केले आहे. तसेच वालुथ हे गाव सुशिक्षित करण्यात त्यांचा सहभाग आहे. या गावात राजकारणापेक्षा शिक्षण पूर्ण केले पाहिजे ही शिकवण मिळाली आहे तसेच सामाजिक कार्यातही गाव पुढे जात आहे असेही स्पष्ट केले.
पाटणे, म्हणाले डॉ गोळे यांनी सामाजिक बांधीलकी जपली आहे. हिल मॅरोथानच्या माध्यमातून आरोग्यासाठी धावले पाहिजे याची सुरुवात केली आहे. व्यक्तिगत जीवनात माझ्या वडिलांच्या आजारपणी त्यांनी खूप सहकार्य केले. धीर दिला. अनेकांचे ते फॅमिली डॉक्टर बनले आहेत.
सत्काराला उत्तर देताना व्यसनमुक्त राज्य अध्यक्ष विलास बाबा जवळ म्हणाले, गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील अनेक गावातील बेकायदेशीर दारू दुकान बंद करण्याची सुरुवात केली. अनेक अडचणी आल्या पण, सातारा जिल्ह्यातील प्रसार माध्यमे व हरिष पाटणे यांनी व्यक्तिगत पातळीवर आर्थिक मदत केली आहे. जावळीतील जनतेने पाठींबा दिला म्हणूनच राज्यात जावळीतील दारू दुकान बंद करण्यास यश मिळाले. दारूमुळे संसार सुखाचा होत नाही तर उध्वस्त झाले आहेत. या पुरस्काराने जबाबदारी वाढली आहे. यावेळी उपस्थित मान्यवर यांनीही मार्गदर्शन केले. तसेच गोळे परिवार यांच्यावतीने उपस्थित ग्रामस्थ, पदाधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक योगेश गोळे यांनी केले. तर डॉ गोळे यांनी सामाजिक कार्यासाठी पुढाकार यापुढे घेतला जाईल, असे सांगून सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला वालुथ, सोमर्डी, हुमगाव परिसरातील ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |