सातारा : बोगदा ते शेंद्रे रस्त्यावरील सोनगाव, ता. सातारा गावच्या हद्दीतील एका विहिरीत एका अनोळखी 30 ते 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून ही घटना दि. 9 रोजी घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोनगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत वाकडदान नावाच्या शिवारात असलेल्या सुनील बळीराम नावडकर यांच्या मालकीच्या विहिरात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. त्याचे वय 30 ते 35 वर्षादरम्यान असून अंगात काळय़ा, निळय़ा पट्टयाचा टीशर्ट, निळय़ा रंगाची पँट परिधान केलेली आहे.
या घटनेची माहिती परिसरात कळताच एकच खळबळ उडाली. घटनेची खबर नितीन उत्तम नावडकर यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह ट्रेकरच्या सहकार्याने बाहेर काढला. विहिरीत बुडून अनोळखीचा मृत्यू अशी सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देसाई करत आहेत. यासंदर्भात कोणास काही माहिती असलेल्या संबंधितांनी तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |