12:05pm | Nov 20, 2018 |
सातारा : प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेविका सीता हादगे यांचे पती राम हादगे यांनी सातारा नगरपालिकेच्या वार्षिक विविध कामांसाठी निविदा भरल्याप्रकरणी त्यांना अपात्र करण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली होती. याप्रकरणी जिल्हाधिका-यांना मुख्याधिका-यांना अहवाल देण्यास सांगितला होता त्यानुसार मुख्याधिका-यांनी अहवाल दिला असून त्यात राम हादगे यांनी निविदा भरल्याचा उल्लेख आहे. तर नगरसेविका सीता हादगे यांनीही मुख्याधिका-यांना 4 जून रोजी पत्र दिले असून त्यात पती राम हादगे यांच्याबरोबर सुसंवाद नसून त्यांनी भरलेल्या टेंडरबाबत विचार करु नये असे लिहिले आहे. दरम्यान याप्रकरणी आता 30 नोव्हेंबर सुनावणी होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
सातारा नगरपालिकेचा कारभार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. नगरसेविकांच्या पतींच्या हस्तक्षेपाबाबत पालिकेच्या वर्तुळात नेहमी चर्चा होत असते. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या दक्षतेमुळे नगरसेविका सीता हादगे यांचे पती राम हादगे यांनी पालिकेच्या वार्षिक विविध कामांसाठी निविदा भरल्याचे प्रकरण उजेडात आले होते. याप्रकरणी त्यांनी नगरसेविका सीता हादगे यांना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 44 नुसार अपात्र करण्याबाबत जिल्हाधिका-यांकडे मागणी केली होती. त्यावर सुनावणी सुरु असून जिल्हाधिका-यांना मुख्याधिका-यांना याबाबत अहवाल देण्यास सांगितला होता. त्यानुसार मुख्याधिका-यांनी जिल्हाधिका-यांना अहवाल दिला असून त्यात नगरपालिकेच्या विविध वार्षिक कामांसाठी निविदा भरलेल्यांची नावे असून त्यात राम हादगे यांचेही नाव आहे. परंतु मक्तेदार जी.एस.टी. नोंदणीकृत असणे आवश्यक आहे ही अट नसल्याने सदर कामांच्या फेर निविदा करण्यास मंजुरी मिळाल्याचे म्हटले आहे. सुशांत मोरे यांनी तक्रारीसोबत जोडलेली कागदपत्रे खरी असून पडताळणी केलेली आहे. त्याचप्रमाणे नगरसेविका सीता हादगे यांनी 4 जुन रोजी मला पत्र दिले असून त्यात माझे पती राम हादगे यांनी वार्षिक टेंडर कामी ई टेंडर भरल्याचे वर्तमानपत्रातून कळाले. खरोखर माझ्या पतीने सदर टेंडर भरले असल्यास ते त्यांना देण्यात येऊ नये. माझे पती व माझ्यामध्ये सध्या सतत वाद होत असून ते त्यांच्या पारंपारिक व्यवसायाबाबत काय निर्णय घेतात हे मला सांगत नाहीत. त्यामुळे अलीकडे आमच्या दोघांत सुसंवाद राहिलेला नाही. तरी माझ्या पतीने भरलेल्या टेंडरबाबत कोणताही विचार करु नये व त्यांना ते देण्यात येऊ नये. सदर टेंडर देण्याबाबत माझा विरोध आहे. सदर प्रक्रियेबाबत माझा कोणताही थेट अथवा अप्रत्यक्ष संबंध नाही. तरी वरील टेंडरबाबत आपण कोणताही निर्णय घेतल्यास त्याची जबाबदारी माझी नसेल असे म्हटले आहे. मुख्याधिका-यांना अहवालासोबत हे पत्र जिल्हाधिका-यांना पाठवले आहे. याबाबत संबंधित सर्वांना हजर राहण्याबाबत जिल्हाधिका-यांना नोटीसा काढल्या असून याप्रकरणी 30 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे याप्रकरणी काय होणार याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |