03:45pm | Aug 14, 2019 |
सातारा : जागतिक वारसास्थळात समाविष्ट झालेले कास पठार पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. पावसाळ्यानंतर उमलणारी विविधरंगी व दुर्मीळ फुले पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक या पठाराला भेट देतात. या पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा व कासच्या वैभवात भर पडावी, यासाठी बोगदा-कास रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. परंतु या कामासाठी अद्याप मुहूर्तच मिळालेला नाही.
जैवविविधतेने नटलेले कास पठार हे फुलांसाठी प्रसिद्ध आहे. पावसाळा संपला की या ठिकाणी सुरू होणारा फुलोत्सव डोळ्यांचे पारणे फेडतो. फुलांसह अनेक दुर्मीळ प्रजातीची फुलपाखरे या परिसरात नेहमीच आढळून येतात. त्यामुळे पर्यटकांसह पक्षी व प्राणीमित्रांची पावले दरवर्षी कासकडे वळत असतात. आपल्या वैशिष्टपूर्ण फुलांमुळे कास पठाराची नोंद अल्पावधीतच युनोस्कोच्या जागतिक वारसास्थळामध्ये झाली. फुलांचा हंगाम सुरू झाला की जगभरातील सुमारे दीड ते दोन लाख पर्यटक या पठाराला भेट देतात.
कास पठाराबरोबचर कास तलाव, देशातील सर्वात उंच असलेला भांबवली-वजराई धबधबा पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. याशिवाय शनिवार व रविवार या सुटीदिवशीही काही हौशी पर्यटक कास पठार व तलावाला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटतात. गेल्या तीन-चार वर्षांपासून याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा नेहमीच सामना करावा लागतो. यावर तात्पुरता उपाय म्हणून वनविभागाच्या वतीने फुलांचा हंगाम सुरू झाल्यानंतर आॅनलाईन बुकिंगच्या माध्यमातून पर्यटकांच्या संख्येवर नियंत्रण आणले जाते. ही समस्या कायमस्वरुपी सुटावी व पर्यटकांना निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी बोगदा ते कास या मार्गाच्या रुंदीकरणाचा विषय एक ते दीड वर्षापूर्वी चर्चेस आला. शासनाने या मार्गाची ऑनलाईन निविदा काढण्याची तयारी केली मात्र वित्त विभागाने सहा प्रकल्पांचा निधी आटवल्याने पुढच्या हालचाली थंडावल्या. बोगदा ते यवतेश्वर या साडेसहा किलोमीटरच्या मार्गाचे मजबूती करण हा विषय महत्वाचा होता. मात्र पावसाळ्यात साताऱ्यात या मार्गावर दरड कोसळणे किंवा मार्ग खचणे यामुळे रुंदीकरणाच्या अडचणी अद्यापही संपलेल्या नाहीत. ऑनलाईन निविदांची हालचाल होऊनही सहा महिने उलटत आले तरी बांधकाम विभागाला अद्याप हिरवा कंदिल मिळालेला नाही.
उद्घाटन झाले; पण काम रखडले
सातारा जिल्ह्यातून जाणारा आणखी एक राज्यमार्ग म्हणजे महाबळेश्वर-विटा (सांगली). या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होऊन आठ महिने झाले तरीही कामाला सुरुवात झाली मात्र रस्त्यांची कामे तीन टप्प्यात वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आल्याने कामाने गती पकडली तरी काम अद्याप पूर्ण झालेले नाही .. हायब्रीड अॅन्युइटी कार्यक्रमांतर्गत काम मंजूर आहे. महाबळेश्वर-केळघर, मेढा, सातारा-रहिमतपूर, पुसेसावळी असा हा मार्ग असणार आहे.या रस्त्याची महाबळेश्वरपासून धामणेर (ता. कोरेगाव) ही लांबी ७१ किलोमीटर आहे. या रस्त्याला ४९६.४४ कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. महाबळेश्वर ते धामणेर या अंतरातील कामासाठी २८४.१७ कोटी रुपये अंदाजित रक्कम आहे. या अंतर्गत २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात २४.८२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |