07:02pm | Mar 16, 2019 |
फलटण : माढा लोकसभा मतदार संघातील तिढा अद्याप सुटला नसून भाजपा, रासप आणि मंत्री सदाभाऊ खोत यांनीही या मतदार संघावर आपला हक्क सांगितला असतानाच आज फलटण येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादीला देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांचे बंधू आणि फलटण पालिकेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह यांनी राष्ट्रवादीला तीव्र विरोध दर्शवून वेळ पडली तर रणजितसिंहाना लोकसभा लढवायला लावू असे विधान केले आहे. कार्यकर्त्यांनीही "रणजीतदादा माढा लोकसभा लढा ; आणि राष्ट्रवादीला गाढा" असा नारा दिल्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फलटण मधून कोलदांडा बसला आहे.
फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आज तातडीची बैठक होऊन आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यास सर्वच कार्यकर्त्यांनी विरोध केला तसेच माढा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेसला सोडण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
येथील हॉटेल आर्यमानमध्ये फलटण नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष तुकाराम शिंदे, नगरसेवक सचिन बेडके, सचिन अहिवळे, अशोकराव भोसले, अमित रणवरे, शिवाजीराव फड़तरे, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, नगरसेवक आदी उपस्थित होते
फलटण तालुक्यात राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी नेहमीच राष्टीय काँग्रेसच्या कार्यकर्त्याना सापत्नभावाची वागणूक दिली असून अनेक कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे फक्त निवडणुकीसाठी त्यांना आघाडी धर्म आठवतो. त्यांना सत्तेची हाव असून लोकसभा विधानसभा निवडणूक वगळता त्यांना आघाडी धर्म आठवत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोणत्याच उमदेवाराचा प्रचार न करण्याच्या निर्णय या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
सध्या राष्ट्रवादीकडे माढा लोकसभा मतदार संघ असून त्यांच्यातील मतभेदमुळे अजूनही उमेदवार ठरलेला नाही, त्यामुळे राष्ट्रवादीने मोठे मन दाखवून हा मतदारसंघ राष्टीय काँग्रेसला सोडावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनी अपक्ष किवा भाजपा मधुन निवडणूक लढवण्याची मागणी केली.आज झालेल्या बैठकीत काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फलटण मधून कोलदांडा बसला आहे. उमेदवारीच्या तिढ्यात अडकलेल्या राष्ट्रवादीसमोर अधिकच पेच निर्माण झाल्याचे चित्र यानिमित्ताने निर्माण झाले आहे.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |