नवी मुंबई : भावाबरोबर देवदर्शनासाठी आलेल्या एका 15 वर्षीय मुलीचे चार मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांनी अपहरण केल्याची घटना सानपाडा येथील सेक्टर 14 मधील बुद्धेशर मंदिराजवळ शुक्रवारी सायंकाळी घडली. दरम्यान, 3 तासांनी पोलिसांनी या मुलीचा शोध लावला. त्यावेळी ती बेशुद्धावस्थेत होती. तिला वैद्यकीय तपासणीसाठी महापालिका रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.
होळीच्या रंगांनी चेहरे माखलेल्या या अपहरणकर्त्यांनी या मुलीच्या भावाला जोरदार धक्का मारून त्याला खाली पाडले आणि या मुलीला पांढर्या मारुती ओमिनीमध्ये कोंबून गाडी पामबिचच्या बाजूने सुसाट नेली. दिवसाढवळ्या भरवर्दळीच्या भागात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सानापाडा येथे चौरंग हौसिंग सोसायटी, प्लॉट नं. 16 येथे राहणारी 14 वर्षीय यामिनी राजपुरोहित ही मुलगी आपल्या भावाबरोबर सायंकाळी साडेसहा वाजता बुद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी निघाली होती. दोघेही मंदिराच्या जवळ असताना तेथे पांढरी मारुती ओमिनी कार आली. चार तरुण या गाडीतून खाली उतरले. त्यांचे चेहरे होळीच्या रंगांनी पूर्णपणे माखले होते. त्यांनी या मुलीच्या भावाला जोरदार धक्का देऊन खाली पाडले आणि या मुलीला जबरदस्तीने उचलून गाडीत कोंबले. त्यानंतर अपहरणकर्ते या मुलीसह पामबिचच्या दिशेने वेगात निघून गेले.
अपहरणकर्त्या तरुणांचा शोध घेण्यात येत असून रायगड, ठाणे, नवी मुंबई पोलिसांना सतर्क करतानाच नवी मुंबईतून जाणार्या सर्व मार्गांची सीसीटीव्ही फुटेज तपासणी गुन्हे अन्वेषण विभागाने हाती घेतली आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |