वाई : महाबळेश्वरला फिरायला निघालेल्या एका जोडप्यावर पसरणी घाटात आज दुपारी 3.15 च्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञात युवकांनी कोयत्याने हल्ला चढवून पलायन केले. यामध्ये गंभीर जखमी झालेला आनंद ज्ञानेश्वर कांबळे (रा. अजंठानगर, औंध, पुणे) याचा सातारा सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्याची पत्नी दिक्षा कांबळे ही किरकोळ जखमी झाली. हल्ल्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, पुणे येथील राजेश भगवान बोबडे व सौ. कल्याणी बोबडे (रा. काळेवाडी, पुणे) तसेच आनंद व त्याची पत्नी दिक्षा असे चौघेजण इनोव्हा कारमधून (क्र. एम एच 14 जीएक्स 7171) महाबळेश्वरला फिरायला निघाले होते. दुपारी 3.15 च्या सुमारास पसरणी घाटात सोळा नंबरजवळ दिक्षाला उलटी होवू लागल्याने त्यांनी गाडी रत्याच्या कडेला थांबवली. यावेळी आनंद व दिक्षा गाडीतून उतरून थोडे बाजूला उभे राहिले. तर राजेश व कल्याणी बोबडे संरक्षक कठडयावर बसून फोटो काढत होते. यावेळी पाचगणीहून दोन दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी दिक्षाला पकडून ठेवले तर इतर दोघांनी आनंदवर कोयत्याने वार केले. आनंद रक्ताच्या थारोळयात कोसळला. तर दिक्षा किरकोळ जखमी झाली. यावेळी राजेश व कल्याणी हे गाडीत बसून निघत असल्याचे पाहून हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीची काच फोडली. दोघांनी थेट पाचगणी पोलीस ठाणे गाठले. मात्र घटना वाईच्या हद्दीत घडल्याने तेथून वाईला येवून त्यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली.
दरम्यान आनंद व दिक्षा यांना एका वाहनचालकाने गाडीतून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथून ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांनाही सातारा येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. परंतू आनंदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
काही प्रत्यक्षदर्शींनी पोलीसांना दुचाकीचा क्रमांक दिला असून त्याअनुशंगाने पोलीस तपास करीत आहेत. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम वाई पोलीस ठाण्यात सुरू होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |