02:42pm | Oct 26, 2018 |
फलटण : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, माढा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची नॅशनल फेडरेशन को-ऑप. शुगर फॅक्टरीजच्या संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाली असून या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
नॅशनल फेडरेशन को-ऑप. शुगर फॅक्टरीज संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीत मध्य महाराष्ट्र विभागातून खा. विजयसिंह मोहिते पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची या संस्थेच्या संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाली आहे मात्र त्याबाबत अधिकृत घोषणा निवडणूक निकाला दरम्यान होणार आहे. मध्य महाराष्ट्र विभागात नगर व सोलापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.
नॅशनल फेडरेशन को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि.,दिल्ली ही देशातील सहकारी साखर कारखान्यांसाठी कार्यरत असलेली संस्था असून स्व. वसंतदादा पाटील यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या या संस्थेवर खा. शरद पवार यांचे वर्चस्व अनेक वर्षे राहिले आहे. सध्या या संस्थेचे अध्यक्षपद माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आहे.
राज्याच्या मंत्री मंडळात अनेक वर्षे एक अभ्यासू, जाणकार, सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी बांधीलकी जपत उत्तम काम केलेले मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या मोहिते पाटील यांना सहकार क्षेत्राचा विशेषतः सहकारी साखर कारखानदारीचा प्रचंड अभ्यास आणि अनुभव आहे. या क्षेत्रातील नामवंत संस्था आणि राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघ, ऑल इंडिया इथेनॉल असोसिएशन या संस्थांचे अध्यक्षपद खा. विजयसिंह मोहिते पाटील यांनी भूषविले असून नॅशनल फेडरेशनच्या कामातही ते आपला प्रभाव सिध्द करतील याची ग्वाही या क्षेत्रातील जाणकारांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारी वाढविण्यासाठी त्यांनी मोठे काम केले आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |