सातारा : मुंबई येथे नोकरीला लावतो असे सांगून वेळोवेळी १ लाख १४ हजार पाचशे रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी भाग्यश्री विजय बडे (मूळ रा. नांदगाव ता. सातारा सध्या रा. नालासोपारा, मुंबई) या युवतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व संशयित या मैत्रिणी आहेत. दरम्यान संशयित युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रिया शिंदे (रा. गोडोली, सातारा) यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार प्रिया व संशयित युवती भाग्यश्री बडे यांची 'एमपीएससी'चा अभ्यास करतानाची ओळख आहे. तक्रारदार यांचे लग्न झाल्यानंतर दोघी संपर्कात नव्हत्या. १ जानेवारी २०१८ मध्ये तक्रारदार प्रिया शिंदे यांना भाग्यश्री बडे भेटली. दोघींमध्ये बोलणे झाल्यावर भाग्यश्रीने मुंबई येथे एम्प्लॉई स्टेट कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन येथे नोकरी लावतो पण त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगितले.
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून खात्री दिल्याने तक्रारदार यांनी वेळोवेळी १ लाख १५ हजार रुपये दिले. पैसे दिल्यानंतर मात्र नोकरी देण्यासाठी टाळाटाळ होऊ लागली. नोकरी मिळत नसल्याने तक्रारदार यांनी पैसे मागितल्यानंतर संशयित युवतीने त्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने सोमवारी रात्री तक्रारदार यांनी शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार भाग्यश्री बडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |