02:39pm | Jan 31, 2019 |
कराड : देशासाठी आयुष्य वेचलेल्या सैनिकांना समाजाने पाठीवर थाप टाकली की आनंद होतो. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबालाही गावच्या लोकांनी केलेल्या सन्माने आनंद गगनात मावेना असे होते. आर्मीत असणार्यांचा आदर करा, घरा-दारावर तुळशीपत्र ठेवून ते आपल्यासाठी बॉर्डवर लढत असल्याने त्यांचा असा सन्मान हा सन्मानपत्र असल्याचे सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.
तांबवे (ता.कराड) येथील कोयनाकाठ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित फुटबॉल टीमने माजी सैनिक मराठा बटालियनचे नाईक जगन्नाथ गुरव यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आजी- माजी सैनिकांचा जाहिर सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा ते बोलत होते. कार्यक्रमास नायब सुभेदार मुस्सा मुल्ला, रिटायर्डर आँरनरी कॅप्टन शंकरराव बाबर, कराड तालुका वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील, सरपंच संतोष कुंभार, उपसरपंच धनंजय ताटे, पी. डी. पाटील, निवासराव पाटील, साई हॉस्पीटलचे डॉ. विजयसिंह पाटील, पोलिस उपनिरीक्षक अशोक भापकर, एम. जे. पाटील, माजी जि.प. सदस्या विजयाताई पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तांबवे, दक्षिण तांबवे व उत्तर तांबवे येथील एकूण 79 आजी- माजी सैनिकांचा व त्यांच्या परिवारांचा सत्कार करण्यात आला.
श्रीनिवास पाटील म्हणाले, या देशाने अनेक हुत्माते दिले आहेत. त्यामध्ये आपल्या भागातील लोकांचा सहभाग असणे ही गौरवाची बाब आहे. आज तांबवे गावात एक मुस्लिम नायब सुभेदार मुस्सा मुल्ला हे पाकिस्तान बरोबर 1971 च्या युध्दात लढले. त्यांचा आज सन्मान होतोय, त्यामुळे आज त्यांना देशसेवा केल्याचे एक सन्मानपत्र मिळाले आहे. तरूणांना आज मोबईलचे वेड लागले आहे, त्याऐवजी त्यांनी इंटरनेटचा वापर हा माहिती घेण्यासाठी, शिक्षणासाठी करावा. फुटबॉल टीमने प्रमाणे खेळात व्यस्त रहावे, आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून समाजाचे काहीतरी देण लागतो ते द्यावे.
शहिद पत्नींचा सत्कार
तांबवे गावातील कृष्णतराव राजाराम पवार हे 5 मराठा बटालियनमध्ये हवालदार होते. 1962 च्या युध्दात पाकिस्तान बरोबर लढताना गोळी लागून वीरमरण आले. कृष्णतराव पवार हे 1956 साली सैन्यात भरती झाले होते. सैन्यदलात शहिद झालेले पवार यांच्या पत्नी सुरेखा पवार यांचा काल सत्कार करण्यात आला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |