सातारा : सातारा आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम आता केवळ जिल्ह्यातच नव्हे तर मोबाईलवर जगभरात कुठेही सहज ऐकता येणार आहे. यासाठी इंटरनेट असलेल्या मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून ‘न्यूज ऑन एआयआर’ हे ऍप डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन सातारा आकाशवाणी केंद्राचे केंद्र अधिकारी यांनी केले आहे.
सातारा आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्रसारभारतीने नुकतेच एक ऍप तयार केले आहे. यासाठी इंटरनेट असलेल्या मोबाईलवर प्ले स्टोअरमधून न्यूज ऑन एआयआर डाऊनलोड करावे. तेथून लाईव्ह रेडिओ मधून भारतातील आकाशवाणीची अनेक केंद्र तुम्हाला दिसतील. त्यातून ‘एआयआर सातारा’ यावर क्लिक करावे. काही क्षणात आपल्या मोबाईलवर आकाशवाणी सातारा केंद्र ऐकू येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
सातारा आकाशवाणी केंद्राचे जिल्ह्यात लाखो श्रोते आहेत. आकाशवाणी केंद्रावर दररोज भक्ती संगीत, दिनविशेष, सुविचार, विविध सदर, मराठी- हिंदी- इंग्रजी बातम्या, मुलाखती, हिंदी- मराठी गाणी, सुगम संगीत असे लहानांपासून मोठ्यापर्यंत तसेच महिलांसाठी विविध कार्यक्रम असतात. माहिती, मनोरंजन असा सकाळ व संध्याकाळ तर दुपारी विविध भारतीवरील गाणी असे दररोज आकाशवाणीचे नियोजित कार्यक्रम असतात. या सर्व कार्यक्रमांचा श्रोते मनमुराद आनंद लुटतात.
सातारा जिल्ह्याबाहेर गेल्यानंतर तसेच देशभरात व देशाबाहेर असणारे श्रोते हे कार्यक्रम ऐकण्यापासून वंचित राहत होते. आता मात्र या श्रोत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जगभरात कोणत्याही देशात असाल तर त्या ठिकाणी आता सातारा आकाशवाणी केंद्र आपण सहज ऐकू शकणार आहात.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |