05:49pm | May 26, 2018 |
सातारा : महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर याठिकाणी सार्वजनिक सुट्यांच्यावेळी पर्यटकांची तोबा गर्दी असते. या पर्यटकांना पर्यटनाच्या आनंदासोबत आधुनिक सुविधांसह आराम मिळावा यासाठी अधिकृत हॉटेल व लॉज व्यवसायीक प्रयत्न करीत असतात. या हॉटेल व्यवसायकांकडून कर स्वरूपात लाखो रूपये नगर पालिकेला मिळतात. तर दुसर्या बाजुला अनाधिकृत हॉटेलचा बोजा अधिकृत हॉटेलधारकांच्या माथी पडत असल्याने मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार असा प्रश्न पडला आहे.
स्थानिक भुमिपूत्रांना रोजगार मिळावा यासाठी 50 वर्षापुर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना आता मुंबईतून हद्दपार होते की, काय अशी साशंकता व्यक्त केली जात आहे. गिरणीकामगार उधवस्त झाले आहेत. त्यामुळे परप्रांतियांचा मुंबईत पगडा वाढू लागला आहे. याची खंत शिवसेनेच्या मतदारांना आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावली खोर्यातील महाबळेश्वरमध्ये आजही शिवसेनेचे प्राबल्या आहे. कट्टर शिवसैनिक महाबळेश्वरचा कारभार पहातात. अनेक मराठी उद्योजक अधिकृत हॉटेल व्यवसाय करीत आहेत. परंतु आता आनिधिकृतरित्या जागो-जागी हॉटेल व लॉज पावसाळ्यातील भू-छत्रीसारखी उभी राहिली आहेत. गेल्या 15 वर्षात ना अन्न व औषध प्रशासन, ना महसुल विभाग, ना नगर पालिका आणि ना पोलीस यंत्रणांनी तपासण्या केल्या नाहीत. पाकिट संस्कृति रूजविल्यामुळे सुमारे 500 ठिकाणी कोणतीही अधिकृत परवानगी नसतानाही हॉटेल व लॉज सुरू आहेत. घरगुती विजेचा वापर, पाणी पुरवठा होत असल्यामुळे अशा अनाधिकृत हॉटेलपासून दरवर्षी सुमारे 1 कोटीचे नुकसान जिल्हा प्रशासनास करावे लागत आहे. विशेष म्हणजे कोणतीही पार्किंग व्यवस्था अशा हॉटेलच्या बाहेर नसल्याने रस्त्यावरच वाहने पार्किंग करावी लागत आहेत.
वीज भारनियमन झाल्यास पर्यटकांना अक्षरशा अंधारात गैरसोयीचा सामना करावा लागतो. अशा ठिकाणी जनरेटर नसल्यामुळे पर्यटकांनची ससेहोलपट होत असते. या विज भारनियमनामुळे अधिकृत हॉटेल चालकांना जनरेटची सोय करताना डिझेलचा वापर करावा लागतो. या डिझेल व्यवसायीकांना मोठे ग्राहक मिळावे म्हणून दिव्याखाली अंधार केला जातो, तसेच पाणी पुरवठा करणारी टँकर लॉबी यांना हात धुवून घेण्यास मदत होते. अशी नेहमीच ओरड असते. ही बाब लोकप्रतिनिधींच्या लक्षात का? येत नाही. हे न उलगडणारे कोडे आहे. निवडणुकीत अनेक आश्वासने दिली जातात पण देशातील अग्रगण्य पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये सायंकाळी 7 नंतर कोणतीही वैद्यकिय सुविधा मिळत नाही. रात्री-अपरात्री उपचारांची सोय नाही. त्यामुळे येणार्या पर्यटकांना गंभीर प्रसंगी महाड, पाचगणी, वाई अथवा सातारा याठिकाणी धाव घेण्याचे प्रसंग ओढावले आहेत. महाबळेश्वरला देश-विदेशातून पर्यटक भेटी देत असतात. मंत्री मंडळातील डझनभर मंत्री, अधिकारी व त्यांचे नातेवाई, मित्र परिवारांचा लवाजमा यांची चांगली उठाठेव होते. मात्र पर्यटनांचा आनंद घेणार्या पर्यटकांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
ऑनलाईन बुकिंगमुळे योग्य स्थळी जाण्यास पर्यटकांना अडचणी येत असल्यामुळे अनेक पर्यटांना ऑनलाईन बुकिंग केलेल हॉटेल व लॉज मिळून येत नाही. काही हॉटेलचे लोकेशन चुकीच्या पध्दतीने दिल्यामुळे विशेषत: पहाटे हॉटेल मालकांना काही पर्यटक उठवून विचारपूस करतात. अशावेळी प्रवास करून दमलेल्या पर्यटकांना हॉटेल शोधण्यासाठी वेळ व पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे महाबळेश्वरच्या सर्व हॉटेलची तपासणी तटस्थपणे पर्यटन विभागाने करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |