सातारा : सातारा शहरातील एका बिअर शॉपच्या व्यवस्थापकाला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बीअर शॉपचा व्यवस्थापक राहुल गौतम ढाले (रा रविवार पेठ, सातारा) यांनी संदीप तुकाराम किर्दत, सुमित प्रकाश शेटे (दोघे रा. करंजेपेठ,सातारा) यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, सातार्यातील क्रीडा संकुलाजवळ असलेल्या झिंग झिंग झिंगाट या बिअर शॉपीच्या व्यवस्थापकाला शुक्रवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास संशयित आरोपींनी तीन हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली. त्यावर व्यवस्थापक ढाले यांनी हप्ता देण्यास नकार देत तुम्ही शॉपीच्या मालकांचा बोला अशी विनंती केली. त्यामुळे चिडलेल्या संशयित आरोपींनी ढाले यांना मारहाण करुन आम्ही कोण आहे तुला माहिती आहे का?आम्ही करंजे येथील भाई आहोत . दर महिन्याला आम्हाला तीन हजार रुपयांचा हाप्ता द्यावाच लागेल असे म्हणून बिअर शॉपीत अनाधिकाराने घुसून व्यवस्थापकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा शाहूपुरी पोलीसांनी संशयित सुमित शेटे याला बेड्या ठोकल्या. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार करत आहेत.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |