सातारा : क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी दि. १0 सप्टेंबर १९४४ रोजी ब्रिटीश सत्तेला हादरा देवून सातारा जेलच्या तटावरुन उडी टाकल्याच्या घटनेला ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. १0 रोजी सातारा येथे जिल्हा कारागृहाबाहेर असणाऱ्या क्रांती स्मृती स्तंभाला वाळवा (जि. सांगली) येथील हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्यावतीने अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी स्मारक समितीचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी दिली.
सातारा येथे जिल्हा कारागृहाबाहेर मंगळवारी सकाळी दहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक तसेच नागनाथअण्णांचे सहकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रिटीश सत्तेलाच हादरा दिला होता. त्यांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग आणि प्रसंग ऐकलेतरी आजही अंगावर शहारे येतात. त्यांनी ज्यादिवशी सातारा कारागृहातून उडी टाकून ब्रिटीश सत्तेला हादरा दिला तो दि. १0 सप्टेंबर हा दिवस शौर्यदिन म्हणून साजरा केला जातो. दरम्यान, या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी स्मारक समितीचे निमंत्रक वैभव नायकवडी आणि हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाच्यावतीने करण्यात आले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |