10:49pm | Feb 01, 2019 |
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपतींचा सन्मान म्हणून निवडणूक झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस म्हणून कोणत्याही पक्षाचे लेबल न घेता उदयनराजे भोसले साताऱ्यातून अपक्ष निवडणूक लढवणार असतील, तर शिवसेना त्यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही, असे सूतोवाच शिवसेना नेते, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी येथे केले.
सातारा - जावली विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. छत्रपती शिवरायांचे वारस म्हणून प्रत्येकाला त्यांच्याविषयी आदर असला पाहिजे. त्याच भावनेतून आपण हे बोलत असून मध्यंतरीही त्यांची भेट झाली तेव्हा याचा पुनरूचार केल्याचे रावते म्हणाले. उदयनराजे यांनी छत्रपतींचा वारस म्हणून कोणतेही लेबल न घेता लढावे व सर्व पक्षांनी सन्मान म्हणून त्यांना बिनविरोध निवडून द्यावे, असे आपले वैयक्तिक मत आहे. परंतु कोणत्यातरी पक्षाचे लेबल घेऊन ते निवडणुकीला सामोरे जाणार असतील, तर शिवसेना त्यांच्याविरोधात उमेदवार देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिवसेना सातारची जागा लढणार असून आम्ही जिंकण्यासाठीच लढू, असे रावते यांनी याप्रसंगी सांगितले असता उमेदवार कोण असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना, शिवसेनेत उमेदवार नावापुरता असतो. लोकसभेची निवडणूक पक्षीय पातळीवर होत असते. उमेदवार वजनदार असल्यास त्याची ताकद अधिक शिवसैनिकांचे परीश्रम यातून विजय मिळत असतो असे त्यांनी सांगितले.
शिवसेना - भाजप युतीबाबतही त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला. आम्हाला भगवा फडकवायचा आहे. सत्ता आणायची आहे. राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढण्याची आमची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले. गतवेळी शिवसेनेला विधानसभेच्या ६३ जागा मिळाल्या होत्या, असे छेडले असता, ५० जागा अवघ्या पाचशे मतांच्या फरकाने गेल्या होत्या असे प्रत्त्यत्तर रावते यांनी यावेळी दिले.
शिवसेना उपनेते नितीन बानुगडे - पाटील यांना उमेदवारी देणार काय, या प्रश्नावर, पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने लढू असे रावते यांनी सांगितले. त्याचवेळी, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपणाकडे महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यभरात प्रचारकाची जबाबदारी दिली असून आपण उमेदवारीत गुंतणार नाही, असे बानुगडे - पाटील यांनी स्पष्ट केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |