सातारा : अन्न व औषध प्रशासनाकडून वाई तालुक्यातील दिपचंद प्रतापचंद जैन मालक यांच्या मे. डायमंड कंपनी, शाहबाग फाटा,वाई यांच्यावर आज यांचेकडे अचानक तपासणी केली असता नियम मोडून हळद पावडर विकत असल्यामुळे कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आज अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या व्यापा-याकडून छापलेल्या बॅगवर उत्पादकाचा दिनांक, बॅच नंबर, तसेच उत्पादकाचा पत्ता नसल्याचे आढळुन आले. या लेबलवर सेलम सांगली असे उल्लेखित करुन सदर हळद पावडर ही सांगली येथील असल्याचे भासविले जात असल्याचे आढळुन आल्यामुळे 16 लाख 99 हजार 600 रुपये किमतीचा 16 हजार 996 किलो चा साठा जप्त करण्यात आला. या ठिकाणी तपासणीवेळी हळद पावडरच्या गुणवत्तेबाबत कोणतेही विश्लेषण केलेले नाही.
संदीप सुरेशराव कोरडे मालक यांच्या मे. कोहीनुर स्टॉल, शाहबाग फाटा,वाई येथे तपासणी केली असता हळदपावडरच्या लेबलवर चुकीचा नोंदीणी क्रमांक नमुद केलेला आहे. तसेच मिरची पावडर व कांदा लसून मसाला या अन्न पदार्थाच्या पॅकेटवर लेबल नसल्याचे आढळुन आले असून 382 किलो , रुपये 59 हजार 460 किमतीचा साठा जप्त केला आहे. तसेच येथील इतर 10 अन्न व्यवसायकांची तपासणी करुन अन्न् सुरक्षा व मानदे कायद्यातील नियमावलीचे पालन करुन अन्न पदार्थाची विक्री करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले . सदर कारवाई शिवकुमार कोडगीरे, सहायक आयुक्त (अन्न),सातारा याच्या पथकांने अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार,रोहन शहा, युवराज ढेंबरे, विकास सोनवणे, नमुना सहाय्यक सुनिल सर्वगोड यांनी व सुरेश देशमुख, सहआयुक्त,पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखली करण्यात आलेली आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |