पाचगणी : केळघर घाटातील काळाकड्याच्या तीव्र वळणावर कन्टेनरची ब्रेक निकामी झाल्याने चालकाच्या प्रसंगअवधानामुळे चित्रपटात दाखवतात असाच काळाकड्याच्या तीव्र दरीमध्ये लोंबकळत राहिल्याने सुमारे ३०० फुट दरीत कोसळल्यापासुन बालबाल बचावला. कन्टेनरचे चालक व क्लीनरने प्रसंगावधान राखुन चालत्या कन्टेनरमधुन उडी मारल्याने सुदैवाने काणतीच जीवितहानी झाली नाही.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहीतीनुसार महाडवरुन सातार्याकडे केमिकल भरुन निघालेला कन्टेनर (क्रमांक एच आर ५५ एक्स ७५५४) हा महाबळेश्वर नजीकच्या केळघर घाटात काळाकड्याच्या तीव्र वळणावर गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने कठड्यावर लोंबकळत राहिला. कंटनेरचा चालक मलंग शेख व क्लिनर साहेबलाल शेख यादोघांनी प्रसंगवधान राखत चालत्या गाडीतुन उडी मारली. कन्टेनर काळाकड्याच्या दरीच्या बाजुला असलेल्या झाडाच्या खोडामध्ये अडकल्याने दरीत कोसळला नाही.
चित्रपटातील प्रसंगासारखाच कन्टेनर अडकल्याने प्रत्यक्ष पहाणार्या प्रत्येकाने आश्चर्याचा धक्का बसला. काळाकड्यात सुरक्षा रक्षक कठाडे नसल्याने आजपर्यत चार मोठे अपघात होवुन कित्येक चालकांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. काळ्याकड्याच तीव्र वळण म्हणजे मौत का कुआ म्हणुन ओळखले जाऊ लागले आहे.
दरम्यान अपघाताची बातमी मेढा पोलीसांनी कळताच तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने घटनास्थळी दाखल झाले असुन रात्री उशीरा पर्यंत लटकलेला कन्टेनर काढायचे काम सुरु होते .
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |