सातारा : साता-यात जागतिक महिला दिन प्रशासकीय इतमामात साजरा झाला. विविध विद्यालयांचा सहभाग, चित्ररथ, देखावे, आकाशात फुगे सोडणे आशा भारलेल्या वातावरणाचा उत्साही जल्लोष डोळ्यात साठवून अनेकांना अनुभवता आला. पहाता पहाता या उत्सवाची छायाचित्रे वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली. सोशल मिडियावरही व्हायरल झाली आणि एकामागून एक अशी छायाचित्रे पहाताना एका छायाचित्रावर नजर स्थिरावली. क्षणभर त्या छायाचित्राने मला गंभीर व्हायला भाग पाडले. 'रयत' च्या विद्यार्थीनी पायात चपला घालून जीवंत देखावा सादर करताहेत आणि त्यांच्या पायाशी राजमाता जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासह अन्य कर्तबगार महिलांच्या प्रतिमा असणारे कटआऊट लावलेलं आहे, अशा स्वरुपाचे हे छायाचित्र. खरं म्हणजे, कोणतीही कलाकृती सादर करताना वा साकारताना 'मूल्यभान' राखलं नाही, तर आपल्या 'आदर्शांना' आपणच कसे पायदळी तुडवतो याचाच हा एक प्रकारे ज्वलंत आणि जीवंत देखावा!
या जीवंत देखाव्याचे प्रयोजन करणारे अन्य कोणी असते तर, फारसे काही वाटले नसते. परंतु तथाकथित म्हणवले जाणारे शिक्षक - प्राध्यापक जेव्हा या देखाव्याचे 'प्रारुप' निश्चित करुन ते लहान विद्यार्थींनीच्या माध्यमातून दृष्यरुपात समोर आणतात आणि आदर्शांच्या कटआऊटबाबत ( योग्य ठिकाणी कसे असावे याबाबत ) कमालीचे गाफिल रहातात, तेव्हा त्यांच्या गाफिलतेबाबत अवाक व्हायला होते. पण, अवाक होऊन उपयोग काय ? त्यापेक्षा त्या गाफिलतेचा निषेध करणं आणि यापुढे तसे घडू नये यासाठी सजग रहायला लावणे, हे शहाणपणाचे ठरेल. नाही तर, शिक्षण वर्तुळातील गाफिलता अधिक प्रबळ झालीच म्हणून समजा आणि तसे होणे म्हणजे शैक्षणिक निती मूल्यांवर घाला हा ओघाने ठरलेलाच..! त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील तारतम्य जपल्याशिवाय पर्याय नाही, याची जाणीव प्रत्येकाने नेणीवेत रुजवली पाहिजे.
मुळात शिक्षण हे क्षेत्रच असे आहे की येथे कोणत्याच कामात कोणत्याच स्वरुपातील गाफिलतेला वाव नाही. इथे सतत सतर्कच असायला हवे. त्याचे कारण म्हणजे शिक्षण हे समाज बदलाचे महत्वपूर्ण माध्यम आहे. माणसाच्या जडणघडणीशी आणि त्याच्या वर्तमानाशी व भविष्याशी शिक्षणाचा थेट संबध असतो. तद्वतः नवी पिढी उभारण्याची नैतिक जबाबदारी आपसूक प्राध्यापक या घटकावर येऊन पडते. त्यामुळे इतर क्षेत्रातील शासकीय पदाधिका-यांसारखे प्राध्यापकाला कसेही रहाता वा वर्तन करता येणार नाही. इतर चुकतात म्हणून आपण चुकलो, तर बिघडले कुठे, असे समर्थन सुध्दा प्राध्यापकाला करता येणार नाही. कारण प्राध्यापक हा समाज घडविण्याच्या प्रक्रियेतला मुख्य घटक असतो, हे इथे लक्षात घेतले पाहिजे. एक बँकर चूकला तर एक घोटाळा होतो. एक डॉक्टर चुकला तर एक पेशंट मरतो. एक इंजिनियर चुकला तर एक पूल पडतो, पण एक शिक्षक - प्राध्यापक चुकला तर अवघी पिढी बरबाद होते. म्हणून शिक्षक - प्राध्यापकाने कोणत्याही परिस्थितीत 'मूल्यभान' हरवून बसता कामा नये.
वास्तविक, जागतिक महिला दिनी आपल्या आदर्शांचा विचार आणि कार्यकर्तृत्व डोळ्यासमोर ठेवून नव्या पिढीच्या काळजात नवी जिद्द, नवी हिम्मत, नवा उस्ताह, नवा बुलंद निर्धार आणि उर्जा कशी पेरता येईल, याचा ध्यास घेऊनच कृतीकार्यक्रम करणं आवश्यक होतं. तथापि, तसे करताना बेमालूमपणे का होईना राजमाता जिजाऊ आणि सावित्रीमाई फुले यांचा अवमान झाला, हे वेदनादायी आणि अक्षम्य आहे. तेव्हा यापुढे अवमान होणार नाही यासंबंधी 'मूल्यमंथन' व्हावे, इतकेच !
अरुण विश्वंभर जावळे
९८२२४१५४७२
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |