02:35am | Jul 24, 2018 |
सातारा : महाबळेश्वर तालुक्यातील वनसदृष्य जमिनींना वनविभागाच्या 1980 च्या जाचक तरतुदी लागू करण्यात आल्या तर महाबळेश्वर तालुक्यात बांधकाम करणे सोडा, परंतु शेती करणे शक्य होणार नाही. महाबळेश्वर, पाचगणी शहरांसह तालुक्यातील 110 गावांवर अन्याय होत आहे. वनसदृष्य जमिनींचा फेर सर्व्हे करण्यात यावा. वनसदृष्य जमिनीवर केलेली बांधकामे नियमित करण्यात यावीत. उच्चस्तरील सनयिंत्रण समितीने वनसदृष्य जमिनिंबाबत घेतलेले निर्णय कायम करण्यात यावेत. याबाबत हरित लवादासमोर राज्य सरकारने योग्य बाजू मांडली नाही तर महाबळेश्वर तालुक्याच्यातील जनतेच्या जनहितार्थ खा. श्री. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना एका निवेदनाव्दारे दिला आहे.
नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय हरित लवाद येथे पर्यावरणप्रेमी (बॉम्बे इनव्हरमेंटल अॅक्शन गु्रप,) या संघटनेने सन 2016 मध्ये महाबळेश्वर तालुक्यातील वनसदृष्य जमिनिबाबत याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये महाबळेश्वर, पाचगणी नगरपालिकांनी वनसदृष्य विभागात दिलेल्या काही बांधकाम परवानग्या रद्द करण्यात याव्यात व झालेली बांधकामे पाडून टाकण्यात यावीत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील वनसदृष्य जमिनीवरील बांधकामे पाडून टाकावीत. अशी मागणी बॉम्बे इनव्हरमेंटल अॅक्शन गु्रपने केली आहे. ही पर्यावरण संघटना स्वत: सरकार असल्यागत वागत आहेत. महाबळेश्वर हे राज्यातील व देशातील प्रमुख पर्यटन केंद्र आहे. महाबळेश्वर हे संपूर्ण तालुक्यातील जनतेची उपजिविका या पर्यटनावर व शेतीवर अवलंबून आहे. परंतु याच बॉम्बे इनव्हरमेंटल अॅक्शन गु्रप या पर्यावरण प्रेमी संघटनेने 1997 महाबळेश्वर शहरातील बांधकामाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाने संपूर्ण महाबळेश्वर तालुक्यातील सर्व जमिनिंचा सर्व्हे करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले. महाबळेश्वर तालुका केंद्र शासनाने 2001 साली पर्यावरण दृष्ट्या अतिसंवेदनशिल भाग जाहिर केला आहे. वास्तवात महाराष्ट्र सरकारने या सव्हेबाबत कोणतीही अधिसूचना जारी केली नाही. ज्या जमिनींचा सव्हे करायचा आहे, याबाबत नगर भू-मापन अधिकार्यांमार्फत हा सव्हे केला. परंतु हा सव्हे योग्य पध्दतीने झालेला नाही. यामध्ये अनेक त्रुटी आहेत. हा सर्व्हे स्थळ पहाणी न करताच केलेला आहे. त्यामुळे वनसदृष्य जमिनींचा फेरसर्व्हे करण्यात यावा अशी प्रामुख्याने महाबळेश्वर नागरीकांची मागणी आहे.
बॉम्बे इनव्हरमेंटल अॅक्शन गु्रपने वनसदृष्य जमिनिमध्ये बांधकाम परवाने देण्यात येवू नये, ज्या वनसदृष्य जमिनीमध्ये बांधकामे केलेली आहेत. ती पाडून टाकण्यात यावी. वनसदृष्य म्हणून घोषीत जमिनीबाबत फॉरेस्ट काँजरव्हेशन कायदा 1980 तरतुदी लागू करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे, उच्च स्तरीय सनियंत्रण समिती उच्च स्तरीय सनिंयत्रण समिती यांनी 17 ते 29 फेब्रुवारी 2016 या सभेत वनसदृष्य जमिनीबाबत घेतलेला फेरसर्व्हेचा निर्णय रद्द करणेत यावा, महाबळेश्वर तालुक्याची प्रादेशिक योजना रिजनल प्लॅन मध्ये वनसदृष्यबाबत व्याख्या करण्यात यावी व अंमलबजावणी करावी अशा मागण्या लोकहिताच्या विरोधात केल्या आहेत. यामध्ये बॉम्बे इनव्हरमेंटल अॅक्शन गु्रपने केवळ शासकीय यंत्रणेलाचा प्रतिवादी केले आहे. नागरीकांना प्रतिवादी न करताच कोणत्याही प्रकारचे समन्स किंवा नोटीस न देताच वारंट जारी करण्यात आलेले आहे. यामध्ये जवळजवळ 35 वेगवेगळ्या गावातील मिळकत धारकांचा समावेश आहे. राष्ट्रीय हरित लवाद दिल्ली येथे ट्रान्सफर करण्यात आली आहे. सर्वसाधारण जनता दिल्लीला ये जा करू शकत नाही. ते त्यांना न परवडणारे आहे. दि. 25 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतचे सविस्तर निवेदन दिले जाणार आहे. सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. सरकारने याबाबत गांभीर्याने निर्णय घ्यावा. तसेच जनहितार्थ नागरीकांच्या बाजूने राष्ट्रीय हरित लवादासमोर बाजू मांडावी. व खा. श्री. उदयनराजे भोसले यांनी योग्य नियमावली करण्याबाबत केंद्र सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करावा. अन्यथा महाबळेश्वर जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा महाबळेश्वर नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे यांनी दिला आहे.
यासंदर्भात तातडीची बैठक खा. श्री. छ. उयनराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी नगरसेवक कुमार शिंदे, अॅड. संजय जंगम, अॅड अरूण खोत, जिल्हा परीषदेचे माजी शिक्षण सभापती अमित कदम, सदिप आखाडे, जिल्हा वनक्षेत्रपाल अंजनकर, सहाय्यक संचालक नगररचनाकार वाघमोडे, वाईच्या प्रांतधिकारी अस्मिता मोरे, महाबळेश्वर तहसिलदार रमेश शेंडगे यांची उपस्थिती होती.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |