02:53pm | Dec 09, 2019 |
हैद्राबाद : हैदराबाद येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून मारणारे ४ आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झाले. या एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी तेलंगण सरकारने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या विशेष तपास पथकाचे नेतृत्व रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश एम. भागवत हे करणार आहेत.
रविवारी हैद्राबादच्या सायबराबाद पोलिसांविरोधात हैद्राबाद एन्काउंटर हे बनावट एन्काउंटर असल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर तेलंगणच्या केसीआर सरकारने तपासासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. या बाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रचकोंडाचे पोलीस आयुक्त भागवत यांच्या नेतृत्वाखील तयार झालेली टीम एन्काउंटरच्या सर्व बाजूंचा बारकाईने तपास करणार आहे. विशेष म्हणजे भागवत हे मराठी आयपीएस अधिकारी असून ते रचकोंडाचे पोलिस आयुक्त म्हणून काम करत आहेत. पोलिस आयुक्त महेश एम. भागवत यांच्या नेतृत्त्वाखालील एसआयटीमध्ये त्यांच्यासह आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
एसआयटीचे सदस्य एन्काउंटरबाबत साक्षीदार कोण आहेत हे पाहणार असून उपलब्ध होणाऱ्या साक्षीदारांचा जबाब नोंदवणार आहेत. या व्यतिरिक्त एसआयटी या वादग्रस्त एन्काउंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांचीही चौकशी करेल. या वादग्रस्त एन्काउंटर प्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगही सक्रिय झाला आहे. शनिवारी आयोगाच्या टीमने हैद्राबादला येत चौकशी केली. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या टीमने महेबूब नगरच्या शासकीय रुग्णालयाचाही दौरा केला. इथेच एन्काउंटरमध्ये मारल्या गेलेल्या ४ आरोपींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते.
वादग्रस्त हैद्राबाद एन्काउंटरमध्ये ४ आरोपी मारले गेल्याची गंभीर दखल घेत राष्ट्रीय मानवााधिकार आयोगाने शुक्रवारी चौकशीचे आदेश दिले होते. एन्काउंटर हा चिंतेचा विषय असून याची अत्यंत सावधगिरीने चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे आयोगाने म्हटले होते. या बरोबच या चारही आरोपींचे मृतदेह ९ डिसेंबर रात्री ९ वाजेपर्यंत सुरक्षित ठेवण्यात यावेत असे आदेश तेलंगण हायकोर्टाने तेलंगण सरकारला दिले होते.
हैद्राबादजवळ शुक्रवारी पहाटे पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये हैदराबाद बलात्कार आणि खून प्रकरणातील ४ आरोपी ठार झाले होते. या चौघांना बलात्कार आणि हत्येच्या आरोपाखाली २९ नोव्हेंबर या दिवशी अटक करण्यात आली होती.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |