05:18pm | Oct 10, 2019 |
सातारा : सातारा शहर हेच राजघराण्याचे कुटूंब आहे. दोन राजे नेहमीच कुटूंबप्रमुख या भुमिकेतून सातारकरांच्या समस्या सोडवत असतात. मेडीकल कॉलेज, नवीन मेगा प्रोजक्ट आणि रोजगार निर्मीतीसह सातारा शहराचा कायापालट करण्यासाठीच दोन्ही राजें भाजपमध्ये गेले असून दोघांनाही भरघोस मतांनी निवडू द्या. दोन्ही राजे सातारकरांच्या विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाहीत, असा शब्द सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी दिला.
गोडोली आणि पापाभाई पत्रेवाले याठिकाणी बुधवारी भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा पोटनिवडणूकीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले आणि सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. सभेस नगराध्यक्ष सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक अशोक मोने, शेखर मोरे पाटील, रवी ढोणे, सौ. मनिषा काळोखे, निशांत पाटील, श्रीकांत आंबेकर, स्मिता घोडके, प्रकाश बडेकर, जेष्ठ नेते व्यंकटराव मोरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भरत संकपाळ, राजू मोरे, पोपट मोरे, सुनील मोरे पाटील, शशिकांत संकपाळ, पप्पू पवार, नवनाथ काकडे, बबलू मोरे, चारुदत्त सपकाळ, शशिकांत मोरे, बाळासाहेब पाटील, राजेंद्र मोरे, ऍड. सूरज मोरे, माजी नगराध्यक्ष सचिन सारस, रवी माने, अशोक शेडगे, गजेंद्र ढोणे यांच्यासह नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आजपर्यंत दोन्ही राजेंच्या माध्यमातून सातारा शहरात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. कधी नव्हे ते दोघांचीही एकाचवेळी निवडणूक होत असून दोघेही एकाच कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. आता खर्या अर्थाने तंटामुक्ती झाली आहे. दोन्ही राजे एकत्र असून आपण सर्वांनी एकत्र राहून दोन्ही राजांना मताधिक्य द्यावे. पाच वर्षात कधीही तोंड न दाखवणारे पावसाळ्यातील भूछत्राप्रमाणे निवडणूकीत उगवतात. मग त्यांच्या मागं जायचं का विकासाच्या मागं जायचं हे तुम्ही आम्ही ठरवले पाहिजे. शहरात सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय आहे. आता मेडीकल कॉलेज होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अजिंक्यतारा किल्ल्यावर शिवसृृष्टी, नवीन मोठमोठ्या कंपन्या सातार्यात आणणे, यासारखी मोठी कामे करायची असतील तर, सत्तेशिवाय पर्याय नाही. आपल्या दोन राजांच्या आणि भाजपच्या माध्यमातूनच शहराचा गतीने विकास होणार आहे. त्यामुळे दोन्ही राजांना विजयी करुन आपल्या सातारा शहराचा कायापालट करुया, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले.
यावेळी सौ. कदम, शेखर मोरे पाटील, व्यंकटराव मोरे, भरत संकपाळ, रवी ढोणे यांनी मनोगत व्यक्त केले. सुनिल मोरे, गजेंद्र ढोणे यांनी प्रास्ताविक केले. किशोर शिंदे यांनी आभार मानले. दोन्ही कोपरा सभांना युवक, युवती, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |