03:20pm | Aug 23, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील प्रभावी नेते असलेल्या भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांचे उसाची तोडणी होवून आठ महिने उलटून गेले तरी अद्याप शेतकर्यांच्या हातात उसाचा पैसा आलाच नाही. त्यामुळे संधीसाधू राष्ट्रवादी प्रणित शे-सव्वाशे शेतकरी कार्यकर्त्यांनी ऊस बिलासाठी आंदोलन केले. याचा कोणताही परिणाम किसनवीर कारखाना संचालक व प्रशासनावर झाला नाही, उलट राष्ट्रवादीवरच हे आंदोलन बुमरँग झाल्याची चर्चा सध्या सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये सुरु झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील राजकारणावर स्व: यशवंतराव चव्हाण, किसनवीर, प्रतापराव भोसले, लक्ष्मणराव पाटील, माजी आ. लालसिंगराव शिंदे यांनी किसनवीर कारखान्याची उभारणी केली. त्यावेळी ऊस उत्पादकांची संख्या कमी असल्यामुळे साखरेला चांगला भाव मिळत होता. तसेच इतर सहउत्पादनापासून कारखान्याच्या तिजोरीत भरभराटही होत होती. पण राजकीय स्पर्धा आणि सत्तेचा हव्यास यामुळे सध्या भुईंज येथील साखर कारखान्याच्या धुराड्यातून उसाऐवजी राजकारणाचा धूर बाहेर पडत आहे. सध्या या कारखान्याकडे 40 हजार सभासद असून आठ महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करुन किसनवीर साखर कारखान्याने प्रतीटन 2770 रुपये दर देण्याचे जाहीर केले. त्यामुळे शेतकर्यांमध्ये काही काळासाठी समाधान पसरले. विद्यमान संचालकांचा गुणगौरव करण्याची त्यामुळे स्पर्धा सुरु झाली. पण जेव्हा कारखान्यातील कामगारांनाच पगार वेळेत मिळेना, अशी अवस्था झाल्यानंतर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. त्याचबरोबर कर्जाचा डोंगर व व्याजाची डगर वाढू लागल्याने या कारखान्याला कर्ज काढल्याशिवाय नटबोल्टही बदलता येईना, अशी अवस्था झाली. सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे ऊसतोड झाल्यानंतर पंधरा दिवसांत पहिला हप्ता शेतकर्याच्या खात्यात जमा करण्याचे आदेश आहेत. परंतू गेल्या आठ महिन्यांपासून ऊस उत्पादक शेतकर्यांचे सुमारे 70 ते 75 कोटी रुपये देण्यात आलेले नाहीत. आता व्याजासह रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकर्यांनीच केली आहे.
गेल्या आठवड्यात किसनवीर साखर कारखान्याला कोंडित पकडण्यसाठी राष्ट्रवादीच्या युवा नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचा स्टंट करण्यात आला. पण जेमतेम शे-सव्वाशे कार्यकर्ते हजर राहिल्यामुळे अखेर या आंदोलनाची मोळी बांधून ती गुंडाळण्यात आली. ज्यावेळी शेतकरी ऊस बिलासाठी भांडत होते, त्यावेळी तुम्ही सत्ता दिली आहे, तुमचे उसाचे बिल तुम्हीच काढून आणा, असे सांगणारे आता आंदोलनासाठी फूस लावीत आहेत. विद्यमान चेअरमन मदनदादा भोसले यांना पुरस्कार देताना ज्येष्ठ नेते गौरवोद्गार काढतात, तर दुसर्या बाजूला राष्ट्रवादीचे आमदार भ्रष्टाचाराचा आरोप करुन निवेदन देतात. ही बाजू उघड झाल्यामुळे या आंदोलनाला फारसे गृहीत धरण्यात आले नाही. त्यामुळे हे आंदोलन बुमरँग सारखे राष्ट्रवादीवरच उलटले आहे. या आंदोलनानंतर किसनवीर साखर कारखान्याने विम्याच्या पैशातून कारखान्याच्या वारसदारांना अर्थसहाय्य करुन आपण आजही सामाजिक काम करतो, हे दाखवून देण्यात यश मिळवले आहे. सध्या किसनवीर कारखान्याने कुडाळ येथील प्रतापगड व खंडाळा येथील कारखान्यासाठी मदतीचा हात दिला. आता याच हातावर बोजा पडल्यामुळे प्रशासनसुद्धा थकून गेले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |