11:49pm | Jan 17, 2019 |
सातारा : कोडोलीतील सम्राट चौकानजीक सम्राट निकम या युवकाचा खून झाल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य दोन संशयित आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता दि. 24 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अद्याप उर्वरीत संशयितांचा शोध सुरुच आहे. दरम्यान, जुन्या भांडणाच्या कारणातून संशयितांनी खूनाचे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.
मयुर राजेंद्र जाधव (वय 20, रा.दत्तनगर, कोडोली) व सौरव उर्फ कुक्या कैलास खरात (वय 21, रा.मल्हार पेठ) अशी अटक केलेल्या व पोलिस कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सम्राट निकम (वय 28, रा.कोडोली) या युवकाचा रहिमतपूर रस्त्यावरील काळोशी चौकात लाकडी दांडक्यासह धारदार शस्त्राने खून झाला. भरदिवसा थरारक घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. संशयितांनी वर्मी घाव केल्याने सम्राट रक्ताच्या थारोळ्यात पडला व तेथेच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरासह जिल्हा शासकीय रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मारेकर्यांना पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. अखेर पोलिसांनी परिस्थिती हाताळल्यानंतर रात्री उशीरा मृतदेह कुटुंबियांनी ताब्यात घेतला.
सम्राट निकमच्या खूनप्रकरणी त्याचे चुलते संजय निकम यांनी पहाटे आठ जणांविरुध्द खून, खंडणीप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार मयुर राजेेंद्र जाधव (रा.कोडोली), सौरभ खरात उर्फ कुक्क्या, धीरज शेळके, संग्राम दणाणे (तिघे रा.मल्हार पेठ), बाळकृष्ण जाधव, शशिकांत जाधव, विजय दिनकर जाधव, बाळासाहेब तांगडे (सर्व रा.कोडोली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील विजय जाधव हे सातारा पोलिस दलातून नुकतेच निवृत्त झाले आहेत. तक्रारीमध्ये निवृत्त पोलिसाचे नाव आल्याने खळबळ उडाली.
खूनाच्या घटनेनंतर पोलिसांनी संशयितांना पकडण्यासाठी जंगजंग पछाडले. अखेर मंगळवारी रात्री उशीरा यातील मुख्य संशयित मयुर जाधव व कुक्या खरात सांगली जिल्ह्यात सापडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून सातार्यात आणून अटक केली. संशयितांकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी खून केल्याची कबुली दिली. दरम्यान, तक्रारीत एकूण आठ जणांची नावे आहेत. अद्याप सहा जणांना अटक झालेली नाही. या प्रकरणाशी संबंधित असणार्यांना मंगळवारपासून पोलिस चौकशीला बोलवत आहेत. गुरुवारीही काही संशयितांकडे चौकशी सुरुच होती.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |