सातारा : परिपूर्ण विकास करुन गावाचा चांगला लौकिक वाढवला तर सातारा जिल्हाची ओळख ही बदलेल. सरपंच आणि सदस्यांनी गावासाठी सर्वोत्तम काम करून दाखवा. गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीचे अधिकार, योजना, कर्तव्य, जबाबदाऱ्या आणि कामे शिका आत्मसात करा,असे आवाहन उपसभापती जितेंद्र सावंत यांनी केले.
नागठाणे येथे सातारा पंचायत समिती, सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, वर्ये यांनी संयुक्तपणे सातारा तालुक्यातील १४ सरपंच, सदस्यांसाठी मंगळवार दि.२६ पासून तीन दिवस प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळे उद् घाटन पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसभापती जितेंद्र सावंत, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, आदर्श सरपंच रवींद्र माने, प्राचार्य कोडगुले, विजय जाधव, प्रदिप पाटणकर,विस्तार अधिकारी साळुंखे, ग्रामसेवक सचिन पवार हे उपस्थित होते.
गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी ग्रामपंचायतीचे कामकाजाचे ज्ञान प्रशिक्षणातून मिळाल्यानंतर गावाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले. विजय जाधव, रवींद्र माने, प्रदीप पाटणकर यांनी पहिल्या दिवशी मार्गदर्शन केले.
सातारा तालुक्यातील अपशिंगे, खोजेवाडी, भरतगाववाडी, काशिळ, कोपर्डे, तुकाईचीवाडी, सायळी(पुर्न), गणेशवाडी, रामकृष्णनगर, नागठाणे, सोनगाव तर्फ सातारा, धोंडेवाडी (कामेरी), देशमुखनगर, टिटवेवाडी, कामेरी या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.
"देशातील आदर्श ग्रामपंचायत मान्यांचीवाडीची यशोगाथा बघायला या..!
लोक सहभागातून सर्वांगिण विकास करून गावाचे देशपातळीवर लौकिक वाढवला आहे. राज्य आणि केंद्र स्तरावरील ५१ पारितोषिक पटकावली आहेत. गावातील प्रत्येकाला मान्यांचीवाडी असल्याचा अभिमान वाटतो. मंत्री, वरिष्ठ अधिकारीसुध्दा मान्यांचीवाडीची यशोगाथा सांगतात. असा विकास करुन दाखवला आहे, या पहा, तुम्हीही करु शकता," अशी सरपंच रवींद्र माने यांनी यशोगाथा सांगितले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |