सातारा : सातार्यात खुलेआम दारुविक्री करणार्या अजय चंद्रकांत घाडगे (वय 42, रा.रविवार पेठ, सातारा) याला सातारा उपविभागीय पोलिस कार्यालयाच्या पथकाने रंगेहाथ पकडून त्याला अटक केली. संशयिताकडून सुमारे 10 बॉक्स दारु जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, चायनिज गाड्यावर दारुच्या बाटल्या सापडल्याने खळबळ उडाली आहेे.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवार पेठेत चायनीज गाड्या पाठीमागे बेकायदा दारुविक्री होत असल्याची माहिती सातारा पोलिस उपविभागीय कार्यालयाला मिळाली. सोमवारी रात्री पोलिसांचे पथक तयार करुन घटनास्थळी छापा टाकला असता संशयित त्याठिकाणी पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता चायनिजच्या गाड्यावर देशी दारुचे 8 बॉक्स व इतर दारुच्या बाटल्या, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 36 हजार 472 रुपये किंमतीची मुद्देमाल आढळून आला.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन संशयिताला ताब्यात घेतले. शहर पोलिस ठाण्यात त्याच्यावर रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार इनायतुल्ला मुल्ला, अंकुश यादव, मनोज शिंदे, सुशिल गवळी, हरीदास कराळे, अमोल गिरी, प्रसाद शिंदे, अमित शेडगे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |