05:26pm | Nov 30, 2019 |
सातारा : तंबाखू, सिगारेट, पान मुक्त शाळा परिसर पाहून मनोमन आनंद वाटला, मात्र घरी पालकांनी तंबाखू, सिगारेट अथवा पान आणण्यास सांगितल्यास तुम्ही त्याला नाही म्हणायला शिका असा कानमंत्र सातारा पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र सावंत यांनी विद्यार्थ्यांना दिला.
शुक्रवारी दुपारी उपसभापती जितेंद्र सावंत, मालगाव पंचायत समिती गणाचे सदस्य दयानंद उघडे यांनी शिवतर प्राथमिक शाळेला आज अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांची संवाद साधला. यावेळी मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा शिंदे, शिक्षक प्रवीण पवार, वर्षा जगताप, रूपाली शिंदे, स्वाती रसाळ उपस्थित होते.
प्रारंभी सौ. सुवर्णा शिंदे यांनी प्राथमिक शाळेमध्ये देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग याठिकाणी घेतले जातात. एकूण १३० विद्यार्थी पटसंख्या असून सर्व वर्ग डिजिटल क्लासेस आहे. विद्यार्थ्यांना प्रथम फळा, खडू आणि पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानार्जन केल्यानंतर तेच ज्ञान संगणकाच्या माध्यमातून देण्यात येते. शाळेच्या आवारात परसबाग तयार करण्यात आली असून त्यामध्ये वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची त्याचे उत्पन्न घेतले जाते.
जितेंद्र सावंत यांनी प्रत्येक वर्गात जाऊन संगणकावर कशा पद्धतीने ज्ञान दिले जाते, शिकविले जाते याचे प्रात्यक्षिक पाहिले. जितेंद्र सावंत विद्यार्थ्यांशी हितगुज करताना म्हणाले की, शाळेमध्ये येताना बाहेर तंबाखू, सिगारेट, पान मुक्त शाळा परिसर असा फलक पाहायला मिळाला. तो फलक पाहून मनोमन आनंद वाटला असला तरी प्रत्येक विद्यार्थ्यांनेच नव्हे तर त्यांच्या पालकांनीही दूर राहण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या पालकांनी दुकानातून तंबाखू, सिगारेट अथवा पान आणण्यास सांगितल्यास त्याला नाही म्हणण्यास शिका. येथील विद्यार्थ्यांची संवाद साधला असता या ठिकाणी अत्यंत चांगले शिक्षण दिले जाते हे स्पष्ट होते. शिक्षकांनी आणखी चांगले प्रयत्न केल्यास ही पिढ वैचारिक पिढी घडण्यास मदत होईल असे आवाहन त्यांनी यावेळी केली.
दयानंद उघडे यावेळी म्हणाले, शिवथर प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी आवारात पेव्हर ब्लॉक बसवण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत दीड लाख रुपये निधी त्यावर मी माझ्या फंडातून खर्च केला आहे. मालगाव पंचायत समिती गणातील सर्व शाळा डिजिटल शाळा असून जितेंद्र सावंत यांनी कोणत्याही क्षणी शाळांना भेटी द्याव्यात. प्रत्येक शाळा गुणवत्तेत अग्रेसर दिसून येईल.
पदाधिकाऱ्यांनी केला विद्यार्थिनीचा वाढदिवस साजरा
प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी हितगुज साधत असताना चौथीतील विद्यार्थिनी वेदिका जीवन साबळे हिचा आज वाढदिवस असल्याचे समजल्यानंतर जितेंद्र सावंत आणि दयानंद उघडे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ आणण्यासाठी शिक्षकांकडे काही रोख रक्कम दिली. या दोघांचेही विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून आभार मानले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |