01:54am | Jan 15, 2020 |
कराड : पाटण, कराड व कोल्हापूर जिह्यातील वडगाव, कोडोली, शाहूवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत 2019 मध्ये घडलेल्या चेन स्नॅचींग (सोनसाखळी हिसकावणे) घटनेतील संशयित सराईत आरोपीसह चोरीचे दागिने विकत तसेच घेणारा तसेच हे चोरीचे दागिणे विकण्यासाठी मदत करणारा अल्पवयीन मुलगा अशा तिघांना पाटण पोलिसांच्या पथकाने सापळा रचून गजाआड केले. त्यांच्याकडून 18 तोळे सोन्याचे दागिने, पल्सर मोटार सायकल अशा मिळून 7 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी पाटणचे उपविभागीय अधिकारी अशोकराव थोरात, सपोनि तृप्ती सोनवणे यांची उपस्थिती होती. दरम्यान, या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पाटण न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दौलतनगर (मरळी), ता. पाटण येथे दि. 16 सप्टेंबर 2019 रोजी वत्सलादेवी इंग्लिश मेडीयम स्कूलमधील पालक मिटींग संपवून कु. रिध्दी (वय 13) ही फिर्यादीसोबत चोपदारवाडी गावाकडे दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास पायी चालत असताना कमानीजवळ पाठीमागून लाल काळ्या रंगाची मोटारसायकलवरील इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठन व एक तोळ्याचे मिनी गंठन दोन्ही मिळून 61 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने गळ्यातून ओढून जबरदस्तीने हिसकावून घेवून पलायन केले होते.
फिर्यादीमधील वर्णनाप्रमाणे आरोपीचा सीसीटिव्हीद्वारे तपास करून पोलिसांनी फोटो प्राप्त केला होता. त्यानंतर आरोपीची गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून संशयित मोटारसायकल व आरोपी इसमाचा पाटण पोलीस कसोशिने शोध असताना पाटण तालुक्यातील मोरगिरी विभागातील आंबेघर, ता. पाटण येथील सदर इसम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लक्ष्मण चंद्रकांत चाळके (वय 28 रा. चांदोली वसाहत आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) असे आरोपीचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. तद्नंतर पोलिसांनी संशयित आरोपीच्या घरी जावून शोधन घेतला असता तो पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र आरोपीने गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल (पल्सर क्र. एम. एच. 50/45) दि. 20 नोव्हेंबर 2019 रोजी पोलिसांना आरोपीच्या घरातून जप्त केली. तद्नंतर संशयित आरोपी लक्ष्मण चंद्रकांत चाळके (वय 28) याला वेळोवेळी सापळा रचून पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून अधिक तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
यामध्ये पाटण तालुक्यातील दिक्षी गावच्या हद्दीत, विहे येथे कराड ते चिपळूण रोडवर, चोपदारवाडी गावच्या हद्दीत, कराड तालुक्यात तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव, ता. हातकणगले गावच्या हद्दीत वडगाव ते कोल्हापूर रोडवर, वाठार येथे सेवा रस्त्यावर, कोडोली येथे सर्वोदय चौकात, कोडोली येथे सर्वोदय चौक ते पोकले फाट्यानजीक, येळाणे गावच्या हद्दीत कोल्हापूर ते रत्नागिरी जाणार्या रोडवरील श्रावणी ट्रेडर्स दुकानासमोर अशा विविध 9 ठिकाणी संशयित आरोपी लक्ष्मण चंद्रकांत चाळके याने चेन स्नॅचिंग केल्याचे कबुल केले आहे. यात त्याच्याकडून 18 तोळे सोन्याचे दागिने, पल्सर गाडी असा एकूण 7 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज पाटण पोलिसांनी जप्त केला आहे. सदर संशयित आरोपी लक्ष्मण चाळके हा एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली येथील अंजिक्य विजय मळणगावकर याला चोरीचे दागिने विकत होता. त्यामुळे संशयित आरोपी लक्ष्मण चाळकेसह अंजिक्य मळणगावकर व अन्य एक अल्पवयीन मुलगा अशा तिघांना पाटण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पाटण न्यायालयासमोर हजर केले असता तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पाटणच्या सपोनि तृप्ती सोनवणे, पोलीस हवालदार हणमंत पाटील, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण, भगवानराव पाटील, महादेव आळंदे, पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, मुकेश मोरे, प्रशांत माने, संभाजी जाधव, विजय गुरव या पथकाने परिश्रम घेतले. सदर गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे करत आहेत.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |