06:32pm | Sep 07, 2019 |
सातारा : पुसेगाव, ता. खटाव येथील 2017 सालच्या खंडणी प्रकरणी सातार्यातील भू माफिया आणि खंडणीबहाद्दर सुनिल झंवर याला मोक्का अन्वये अटक झालेली आहे. त्यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडालेली आहे. गेल्या दीड दशकापासून सुनिल झंवर व त्याच्या टोळीने सातारा येथील औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्यातील अनेक जागा कवडीमोल तसेच अवैधरित्या गिळंकृत केलेल्या आहेत. जिल्ह्यातील तत्कालीन पुढार्यांनी यांना पाठबळ दिल्यामुळे यांचे आजपावेतो फावलेले आहे. अनेक महसुली व पोलीस अधिकार्यांना यांनी पैशाच्या जोरावर आपल्या खिशात ठेवले. त्यामुळेच आतापर्यंत त्यांच्या कॉलरला हात घालण्यापर्यंत कोणाची मजल गेलेली नव्हती. परंतू जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी धाडस दाखवून सुनिल झंवरच्या मुसक्या आवळल्या आहेत. मात्र झंवरचे इतर भागिदारही झंवर इतकेच दोषी आहेत. त्यांनाही ठेचावे, अशी मागणी झंवर अँड गँग पीडित लोकांनी केलेली आहे.
सातार्यातील झंवर, घार्गे, भंडारी, ठक्कर ही तशी प्रतिष्ठीत नावे. परंतू अतीप्रतिष्ठा कधीकधी मानवत नाही. हाव वाढल्यानंतर धावही वाढते. त्यामुळेच झंवर आणि त्याच्या गँगने सातारचा सारा सातबाराच स्वत:च्या नावावर करण्याचा चंग बांधलेला होता. त्यामुळेच यांना खरेदी करण्यासाठी सातार्यातील जागाही कमी पडू लागल्या. जिल्ह्यातील एकही मोक्याची जागा झंवर अँड गँगने सोडलेली नाही. सातारा शहरालगत असणार्या उपनगरातील जमिनीचा न्यायालयीन वाद मिटवून घेण्यासाठी पुसेगाव, ता. खटाव येथील राजकुमार जाधव याला जिवे मारण्याची धमकी देवून सुमारे 16 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात मोक्कान्वये झंवर याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. परंतू वर्ष उलटूनही यातील आरोपी सुनिल लक्ष्मीनारायण झंवर याला अटक झालेली नव्हती. या गुन्ह्यातील आरोपी प्रतापसिंह नगरातील गुंड दत्ता जाधव व इतर आरोपी मोक्क्याखाली येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. सुनिल झंवरसारख्या बड्या माशाला पोलिसांनी हिसका दाखवल्यामुळे त्याच्या इतर भागिदारांची तंतरलेली आहे. त्यामुळे त्यांनी आपापल्या राजकीय गॉड फादरकडे धावपळ करायला सुरुवात केलेली आहे. बोगस सातबारा प्रकरणीही झंवर अँड गँगमधील एक भागिदार सहभागी असल्याचे यापूर्वी निदर्शनास आलेले होते. परंतू भ्रष्ट यंत्रणेने त्यालाही क्लीनचिट दिलेली आहे. सामान्य लोकांच्या जमिनी धाकदपटशाहीने व कवडीमोल किंमतीने गिळंकृत करणार्या झंवर अँड गँग बद्दल लोकांच्या मनात चीड निर्माण झाली आहे. आता सापडलाच आहे तर सोडू नका, अशी मागणी होत आहे.
झंवर अँड गँगच्या भानगडी काढायच्या म्हटल्या तर काही दिवसही पुरणार नाहीत. अशीच एक भानगड त्यांनी फलटणमध्येही केलेली आहे. फलटण नरेशांच्या आदेशाने या गँगने श्रीराम सहकारी साखर कारखान्याची जमीनही कवडीमोल किंमतीने घशात घातली. कामगारांची घरे जमीनदोस्त करुन त्याठिकाणी प्लॉटिंग केले. पण भगवान के घर देर है, लेकीन अंधेर नहीं. ज्या फलटण नरेशांनी झंवर अँड गँगला ही जमीन खरेदी करण्यास भाग पाडले. त्याच झंवर अँड गँगला फलटण नरेशांनीच चुना लावला. या चुन्यामुळे मात्र झंवर अँड गँग भलतीच बिथरली. महाराज साहेब, तुमच्या सांगण्यावरुन आम्ही जमीन खरेदी केली. पण आम्हाला दमडीही मिळाली नाही, असे आर्जव या गँगने फलटण नरेशांकडे केले. परंतू जिथे कोणाचा मेंदू चालत नाही, तिथे फलटण नरेशांचा मेंदू जरुर चालतो. श्रीराम सहकारी साखर कारखान्याची सोमवार पेठ, फलटण लगत असलेली ओपन स्पेस जागाच झंवर अँड गँगला विकण्याचा घाट फलटण नरेशांनी घातला. वास्तविक नियमानुसार ओपन स्पेस जागेचा व्यवहार करता येत नाही. परंतू सत्तेच्या जोरावर फलटण नरेशांनी व गँगने या ओपन स्पेस जागेचा व्यवहार केला. ही जागा माजी आमदार प्रभाकर घार्गे, इंदिरा घार्गे, कविता झंवर, राधेशाम भंडारी, सतीश भंडारी, अभिषेक भंडारी, जयंत उर्फ बाळू ठक्कर, रुपाली राजपुरे, धैर्यशील कदम, ज्योती ठक्कर यांच्या नावावर आहे. ओपन स्पेस जागेचा व्यवहार कसा करायचा? या जागेचा सर्च रिपोर्ट तसेच इतर कागदपत्रे तपासल्यास ही जागा कोणीही घेणार नाही, याची खात्री झंवर अँड गँगला होती. त्यामुळे फलटण नरेशांनी भन्नाट आयडिया काढली. ओपन स्पेस जागेची खरेदी-विक्री करता येत नाही. ओपन स्पेस जागा ही नगरपालिकेच्या मालकीची असते. परंतू फलटण नरेश व झंवर अँड गँगने फलटण पालिकेत असलेल्या सत्तेच्या जोरावर याच जागेवर आरक्षण टाकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विशेष सभाही बोलविण्यात आली. या सभेत संख्याबळाच्या जोरावर ठराव पास करण्यात आला. परंतू त्या जागेवर गेल्या पन्नास वर्षांपासून सुमारे 90 कुटूंबे वास्तव्यास आहेत. त्या कुटूंबांना त्या जागेवर हुसकून लावण्यासाठी फलटण येथील सोमवार पेठेतील सोमा उर्फ कात्याभाईला सुपारी दिली. परंतू खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेवून या जागेचा कसा गैरव्यवहार झाला आहे, याचा पाढा वाचल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ या आरक्षणावर 'स्टे' आणला. त्यामुळे फलटण नरेशांसह झंवर अँड गँगच्या तोंडचे पाणी पळाले. फलटण येथील त्या ओपन स्पेस जागेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे मोक्क्याखाली अटक झालेल्या झंवर अँड गँग ला येत्या काही दिवसांतच झटका बसणार आहे. परंतू त्यापूर्वी झंवर अँड गँगमधील इतर सदस्यांनाही ठेचणे गरजेचे आहे. तरच या गँगने नाडलेल्या सामान्य शेतकर्यांसह पीडितांना न्याय मिळणार नाही.
- संग्राम निकाळजे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |