04:46pm | Jul 01, 2018 |
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. उदयनराजे कधी काही करतील याचा नेम नाही. उदयनराजेंच्या सातारी तर्हा सातार्यासह राज्यभरात नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्याचाच प्रत्यय आज भल्या सकाळी सात ते आठच्या दरम्यान आला. आज सकाळी नेहमीप्रमाणेच सातार्यातील हिल रनर्स (धावपटू) यवतेश्वर घाटातून धावण्याचा सराव करीत असताना खा. उदयनराजे यांनी चक्क बुलेटवरुन सवारी करीत धावपट्टूंशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले. उदयनराजेंच्या अचानक झालेल्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे आज सकाळी सातार्यातील शेकडो धावपट्टूंना सकाळी सकाळी सुखद धक्का बसलेला आहे.
आपल्या अनोख्या स्टाईलमुळे सातारा जिल्ह्यासह राज्यभरात प्रसिद्ध असलेले सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार उदयनराजे हे कधी काय करतील, याचा नेम नाही. ‘खा. उदयनराजेंच्या सातारी तर्हा’ सातारकरांना चांगल्याच अवगत झालेल्या आहेत. तरीसुद्धा खा. उदयनराजे सातारकरांना अधुनमधून अनपेक्षित धक्के देत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी खा. उदयनराजे भोसले यांनी फलटणमध्ये घुसून विधान परिषद सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर आणि त्यांच्या दोन बंधूंचे नाव न घेता हल्लाबोल करीत सर्जिकल स्ट्राईक केले होते. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी अंतर्गत झालेल्या कलहामुळे पुढे काय क्लायमॅक्स घडणार, याविषयीची उत्सुकता जिल्हावासियांना लागली होती. असे असताना विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर हे सातारा दौर्यावर आलेले असताना थेट सातारा येथील मध्यवर्ती विश्रामगृहात घुसून ‘कुठे आहे भगीरथ? फोडतोच! या भगिरथाने जिल्ह्याचे वाटोळे केले,’ असे म्हणत मिस्टर रामराजे बसलेल्या कक्षाकडे जात असतानाच जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून उदयनराजेंना मिस्टर रामराजेंच्या कक्षाकडे जाण्यापासून रोखले होते. त्यामुळे होणारा संभाव्य अनर्थ टळला होता. या निवडणूकपूर्व अवकाळी घटनांमुळे जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. असे असतानाच आज भल्या सकाळी खा. उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह आपला मोर्चा यवतेश्वर घाटाकडे वळवला होता. आज चक्क त्यांनी भारदस्त दुचाकी बुलेटवर बसून यवतेश्वर घाटात रपेट मारली. यावेळी दर रविवारी सातारा येथील शेकडो धावपटू (हिल रनर्स) यवतेश्वर घाटात धावण्याचा सराव करतात. नेमक्या याच वेळी खा. उदयनराजेंची स्वारी चक्क बुलेटवरुन धावपट्टूंना दिसल्यामुळे धावपटूही बुचकळ्यात पडले. या अनपेक्षित ‘ट्रेस पासिंग’मुळे धावपट्ूंनाही सुखद धक्का बसला. यावेळी शेकडो धावपट्टूंचा उदयनराजेंना गराडा पडला. अनेकांनी खा. उदयनराजेंबरोबर सेल्फीही घेतल्या. तसेच अनेक धावपटूंना खा. उदयनराजेंनी एनर्जी ड्रिंकचेही वाटप केले. यावेळी सातार्यातील डॉक्टर्स, व्यवसायिक, नोकरदार यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील धावपटू उपस्थित होते. अनेकांनी खा. उदयनराजेंशी वेगवेगळ्या गप्पा मारत हास्यविनोदही केले. उदयनराजेंच्या आज सकाळी झालेल्या अनपेक्षित ‘ट्रेस पासिंग’मुळे यवतेश्वर घाटात धावणार्या धावपटूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आज सकाळपासूनच खा. उदयनराजेंच्या यवतेश्वर घाटातील बुलेट सवारीची चर्चा सातारा शहरात चांगलीच रंगलेली होती.
‘अहो ढोल असा नाही, असा वाजवायचा’
राजकीय आखाड्यात भल्या भल्यांचा ढोल वाजविणार्या खा. उदयनराजे भोसले यांनी यवतेश्वर घाटात धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी वाजंत्री वाल्यांचा ढोल ताब्यात घेवून स्वत: ढोल वाजवून ढोल असा वाजवायचा, असे मार्गदर्शन केले. यावेळी तुम्ही आता ढोल वाजवून थकला असाल, असे म्हणत धावपटूंसह ढोल वादकांनाही एनर्जी ड्रिंक स्वत:च्या हाताने पाजले. उदयनराजेंच्या या ढोल डिप्लोमसीमुळे मात्र यवतेश्वर घाटातील वातावरण अल्हाददायक झाले होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |