09:35pm | Mar 26, 2020 |
- अजित जगताप
सातारा : कोरोना विषाणू संसर्ग फैलाव रोखण्यासाठी देशातील नागरिकांनी घरी थांबावे यासाठी एकवीस दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी ग्रामीण भागात आता विविध समस्या पुढे येत आहेत. सातार्यात माजी आमदार डिझेल तर दोन महिला शेती व शेतीपूरक उधोगासाठी पेट्रोल व परवानगी मिळावी यासाठी थेट सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या. त्याठिकाणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट व्हावी अशी महिलांनी प्रवेशद्वारावर ड्युटी असलेल्या कर्मचार्यांकडे वारंवार विनंती केली पण, त्यांना पुरवठा शाखेत जाण्याचा सल्ला देऊन त्या कर्मचार्यांनी त्यांना आणखी एका विभागाचा रस्ता दाखवला.
सातारा जिल्ह्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, पेट्रोल-डिझेल पंप, दवाखाने, औषधांची दुकाने उघडी राहतील. असे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी प्रसार माध्यमातून स्पष्ट करून सातार्यातील जनतेला दिलासा दिला होता. जनतेने शिस्तही पाळावी यासाठी रस्त्यावर सफेद रंगाने चौकटी आखल्या होत्या. पाच पेक्षा जास्त लोकांनी गर्दी करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचे पालन करून काहींनी आवश्यक वस्तू खरेदी केल्या. आता मात्र, ज्या दुकानांच्या याद्या दिल्या होत्या. त्यातील काही ठिकाणी दुकाने बंद केली आहेत. शेती उधोगासाठी पेट्रोल-डिझेल देण्यास शेतकरी कुटुंब तसेच प्रतिष्ठित नागरिक यांना पंप चालक स्पष्टपणे नकार देत असले तरी ड्युटीवर असणार्या अधिकारी -कर्मचार्यांना पेट्रोल, डिझेल दिले जाते ही वस्तुस्थिती समोर आली आहे.
सकाळी सातार्यातील भाजीपाला मंडई बंद असल्याने रस्त्यावर भाजी विकत घेण्याची वेळ आली आहे. काल तीस रुपयांनी मिळणारे बटाटे आज सकाळी पन्नास रुपये प्रतिकिलो दराने छोटे भाजी विक्रते विकत होते. त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण नसल्याने कोरोनाच्या पाश्वभूमीवर ‘रस्ते का माल, महागाई मै’ असे नवे धोरण अवलंबले गेले आहे. यामध्ये काही बड्या लोकांनीही हात धुवून घेण्यास सुरुवात केली आहे.
काही ठराविक डॉक्टर हे आपल्याच दवाखान्यातील औषधं लिहून देतात. त्याचेपैकी लांब राहत असलेल्या रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना घराशेजारी असलेल्या मेडिकल दुकानातून तशी औषधे मिळत नाही. त्यांना मोठा फेरफटका मारावा लागत आहे. मास्क, सिनेटिझर मिळणे मुश्किल झाले आहे. याबाबत जिल्हा प्रशासन व पोलिसांनी भरारी पथके तयार करून पाहणी करावी म्हणजे सत्य काय आहे ? त्यावर उपाय योजना राबविणे करणे सोपे जाणार आहे. या परिस्थितीत मानवता भावना जपणे गरजेचे असताना काहीजण साठेबाजी करू लागले आहेत.
ग्रामीण भागात गावची वेस बंद केल्याने गावातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे कर्मचारी आपल्या घरातच अडकून पडले आहेत. बामणोली ता जावळी येथे प्रवेशद्वारालाच कळक लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर गाडी गरजवंता पर्यंत जाऊ शकली नाही. दुर्दैवाने एखादा अपघात रात्रीच्या वेळी घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
जे अधिकारी - कर्मचारी अशा अवस्थेत ड्युटी करीत आहेत. त्यांना घरातील आवश्यक वस्तू आणता येत नाहीत तर घरातील लोकांना बाहेर पडणे रिस्क वाटत आहे. त्यामुळे पोलीस, महसूल, आरोग्य व जीवनावश्यक वस्तूंच्याबाबतीत कार्यरत असणार्या कर्मचारी, त्यांचे कुटुंबातील सदस्य यांच्या अडचणीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा ‘देवळातील देव उपाशी आणि व्यापारी वृत्तीचे पुजारी तुपाशी’ अशी वेळ येऊ नये यासाठी दक्षता घ्यावी लागणारच आहे.
आज सकाळी साडे अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या दिव्यनगरी येथील महिला सुमन कुंभार यांनी सांगितले, गोट्यातील चार जनावरे कशी सांभाळू, दोन दिवस झाले, चारा संपला आहे. निगडी येथून कडबा -वैरण आणण्यासाठी टेम्पो वाहतुकीचा परवाना पाहिजे. केसरकर पेठेतील शोभा फाळके म्हणाल्या, सातारा रोड येथे शेतातील गहू काढायचा आहे. भुईमुगाला पाणी दयाचे आहे. त्यासाठी जायचे असल्याने किमान एक लिटर पेट्रोल मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. माजी आमदार लक्ष्मण माने हे जकातवाडी येथे आश्रमशाळा चालवितात. त्यांच्या जेवणासाठी शेतातील पीक काढून व मळून आणण्यासाठी त्यांना डिझेलची आवश्यकता असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा शाखेतील कर्तव्यदक्ष अधिकारी गंगाधर यांना सांगितले. त्यांनी त्वरित त्याची व्यवस्था करावी, अशी डिझेल पुरवठा करणार्यांना सूचना केली. शेती व इतर महत्वाच्या ही कामासाठी पेट्रोल -डिझेल देण्याची सूचना सर्व पेट्रोल पंप चालकांना केली आहे. जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजे. याची काळजी घेतली आहे. पण, आता काही गावात रस्ते बंद करीत असल्याने पुरवठा त्या क्षेत्रात कसे करणार? असा मार्मिक प्रश्नही उपस्थित होत आहे. सातारा जिल्ह्यातील लोकांचा संयम सुटू नये यासाठी आता वरीष्ठ अधिकारी यांनी कर्मचार्यांना फिल्डवर जाऊन मोबाईल रेकॉर्डिंगसह तक्रारदार सोबत जाऊन अशा दुकानांची तपासणी व पाहणी करावी, अशी सूचना दिली पाहिजे हाच उपाय असल्याचे काही समाज अभ्यासकांनी सांगितले. तसेच लोकांशी संपर्क येणार्या विशेषतः जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारनजिक अनुभवी व मित्तभाषी कर्मचारी नेमावेत, म्हणजे वादावादी होणार नाही अशी सूचनाही जिल्ह्यातील लोक करू लागले आहेत.
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |
शशिकांत शिंदे यांची बाळासाहेब शिंदे यांच्या निवासस्थानी भेट |
छाननीमध्ये 21 वैध तर 3 नामनिर्देशनपत्र अवैध |