01:54am | Jun 23, 2019 |
सातारा : नगरपरिषदेच्या मालकीचे व ताब्यातील असलेले श्री. छ. शाहु स्टेडीयम, जिल्हा क्रीडा संकूल समितीने नवीन क्रीडा संकूल उभारण्यासाठी तबदील करुन घेतले, परंतु त्याठिकाणी क्रीडा संकूलाच्या ऐवजी व्यापारी संकूल उभारुन क्रीडा क्षेत्राची वासलात लावली आहे, क्रीडा क्षेत्राच्या भरभराटीसाठी पुन्हा हे क्रीडा संकूल नगरपरिषदेच्या ताब्यात द्यावे. ज्यांनी नवीन क्रीडा संकूलाचे बांधकाम केले आहे त्या ठेकेदार आर्किटेक्ट,संबंधीत तत्कालीन लोकप्रतिनिधी यांच्याकडून,क्रीडा संकूल उभारणीत राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय नियमावलीप्रमाणे राहीलेल्या त्रुटींची पूर्तता संबंधीतांच्या स्वखर्चातुन करवून घेण्यात यावी, त्यांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामांबाबत, त्यांच्याकडून सशुल्क वसुली करण्यात यावी अशी मागणी सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी,सातारा यांचे दालनात आयोजित केलेल्या क्रीडा संकूलाच्या बैठकी दरम्यान केली.
या आयोजित बैठकीस, नगरसेवक ऍड.डि.जी.बनकर, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, क्रीडा संकुल बांधकामाचे आर्किटेक्चर उपेंद्र पंडीत, रॉबर्ट मोझेस, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी-प्रतिनिधी ईर्शाद बागवान, सुरेश साधले, मनोज कान्हेरे, सौ.गितांजली कदम, आदी प्रतिनिधी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी तथा क्रीडा संकूल समितीच्या अध्यक्षा श्रीमती श्वेता सिंघल यांना वस्तुस्थिती सप्रमाण नमुद करताना, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले की,
गेल्या दहा वर्षापेक्षाही जास्त काळापासून, या क्रीडा संकूलाचे बांधकाम निकृष्ट झाल्याबाबत तसेच झालेले बांधकाम राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय नियमानुसार झालेले नाही ते एक व्यापारी संकूल बनवण्यात आलेले आहे म्हणून चौकशी करण्याबाबत आम्ही वेळोवेळी मागणी केलेली आहे. मात्र अद्यापही आम्हाला कुठलाही चौकशी अहवाला मिळालेला नाही तो तातडीने मिळावा,
क्रीडा संकूलाची मुळ मालकी आमची होती, त्यावेळेस सातारा शहरातील खेळाडुंसाठी स्टेडीयमची उभारणी आमचे वडील तथा तत्कालीन नगराध्यक्ष कै.दादामहाराज यांनी केली. त्यानंतर हे क्रीडा संकूल 99 वर्षाच्या कराराने सातारा नगरपरिषदेकडे हस्तांतरीत केले. सन 2002-2003 च्या दरम्यान राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हयात जिल्हा क्रीडा संकूल समिती निर्माण करण्यात आल्या. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषदेच्या ताब्यातील क्रीडा संकूल, नवीन क्रीडा संकूलाचे बांधकाम झाल्यानंतर नगरपरिषदेकडे हस्तांतरीत करु या अटीवर ताब्यात घेतले. वास्तविक बांधकाम होवून 15 वर्षापेक्षा जास्त कालावधी होवून देखिल क्रीडा संकूल समितीने क्रीडा संकूल नगरपरिषदकडे हस्तांतरीत केलेले नाही, त्यामुळे की्रडा संकूल तातडीने ठरलेल्या अटी शर्तीनुसार नगरपरिषदेकडे हस्तांतरीत करावे,
तसेच ज्यांनी कुणी या क्रीडा संकूलाचे बांधकाम केले आहे, आणि जे या क्रीडा संकूलाच्या बांधकामात सहभागी आहेत, त्या आर्टीटेक्चर, बिल्डर,लोकप्रतिनिधी यांच्यावर त्यांनी क्रीडा संकूलाचे बांधकाम करताना, बांधलेला स्विमिंग पूल, क्रीकेटचे आणि ऍथेलेटचे मैदान, हे राष्ट्रीय अथावा आंतराष्ट्रीय नियमावलीप्रमाणे बांधले नसल्याने, त्यांच्यावर कारवाई करुन, या राहीलेल्या तृटींचे भरपाई वसूल करावी. क्रीडा संकूल सुस्थितीत आणण्याकरीता आवश्यकता असेल तर जुनी इमारत पाडुन, विस्तृत मैदान तयार करण्यात यावे अशी देखिल मागणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली. तसेच लवकरच राज्याचे मुख्य मंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेसमवेत या विषयाला वाचा फोडण्याबरोबरच क्रीडासंकूलामध्ये रणजी सामने तसेच पुढील आयपीएलचे सामने खेळवण्याबाबत ठोस कार्यवाही करणेकामी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.
यावेळी विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकारी यांनी चर्चेत सहभागी होताना, बांधलेल्या स्विमिंग पूल, क्रीकेटचे आणि ऍथलेटचे मैदान याबाबत त्रुटी नमुद केल्या, जिल्हाधिकारी यांनी याकामी योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन बैठकीत चर्चेदरम्यान दिले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |