04:45pm | Apr 10, 2019 |
सातारा : ज्या पक्षाने मला आमदारकीचे सुख लाभू दिले नाही. आमदार झाल्यानंतर तीनच दिवसानंतर माझ्यावर हत्त्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल करुन मला स्वास्थ्य लाभू दिले नाही. एकापाठोपाठ एक खोटे गुन्हे दाखल करुन राष्ट्रवादी कॉंग्रेसने मला वेळोवेळी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. अशा पक्षाबरोबर आघाडीधर्म कशासाठी पाळायचा? असे म्हणत माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीसह विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर तोफ डागत माढा लोकसभेला महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच मदत करणार असल्याचा ठाम निर्धार जयकुमार गोरेंसह त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी केला.
काल दि. 9 रोजी बोराटवाडी, ता. माण येथे आ. जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानाच्या बाजुला आ. गोरे यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कॉंग्रेसमध्ये रहायचे की जायचे, याबाबत अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी मनोगते व्यक्त केली. या मेळाव्यात आ. जयकुमार गोरे यांनी शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवला होता. कार्यकर्त्यांची मनोगते व भाषणे झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनी तुफान भाषण केले. यावेळी ते म्हणाले, मी आमदार होण्याच्या अगोदर माण-खटावमधील उमेदवार फलटण व माणमधून ठरवला जायचा. माण-खटाव तालुक्यातील लोकांना विश्वासात घेतले जात नव्हते. या माण-खटावच्या मातीला सातारा जिल्ह्याच्या राजकारणात पत नव्हती. दुष्काळामुळे गावेच्या गावे स्थलांतरित झाली होती. उरमोडीचे पाणी माण-खटावच्या शिवारात खळखळणार म्हणून अनेकांनी केवळ मतांपुरते या मतदारसंघातील जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केली. परंतू मी आमदार झाल्यानंतर जिहे-कठापूर व उरमोडीचे पाणी माण-खटावच्या माळरानात जिरवले. ज्याठिकाणी कुसळे पिकत होती, त्याठिकाणी आता ऊस पिकू लागला आहे. राहिलेली जी काही गावे आहेत, त्या गावांनाही येत्या काही वर्षांमध्ये पाणी पोहोचवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. माण-खटावच्या धरतीला हिरवा शालू नेसवल्याशिवाय हा जयकुमार गोरे शांत बसणार नाही. जर अडीच वर्षाच्या कार्यकालात माण-खटावमधील इंच न इंच जमीन ओलिताखाली आणली नाही तर हा जयकुमार गोरे आपल्या आमदारकीचा राजीनामा देईल व यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असा विश्वास आ. गोरे यांनी उपस्थित जनसमुदायाला दिला.
यावेळी आ. गोरे यांनी विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे यांच्यावरही जोरदार तोफ डागत माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यामध्ये मिस्टर रामराजें नाईक-निंबाळकर यांचा मोठा हात आहे. जयकुमारला राजकारणातून संपविण्यासाठी बारामतीपासून फलटणपर्यंत फिल्डिंग लावली. परंतू या माण-खटावच्या जनतेच्या पाठिंब्यामुळे मी या बांडगुळांना पुरून उरलो, असा घणाघात आ. गोरे यांनी राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांवर लगावला. पण आता वेगळा विचार करण्याची वेळ आलेली आहे. ज्या राष्ट्रवादीने जयकुमारला संपविण्यासाठी जंगजंग पछाडले, माढ्याचा उमेदवार ठरवताना विश्वासात घेतले नाही, अशा राष्ट्रवादीच्या पाठिमागे जाणे म्हणजे माण-खटावचा स्वाभिमान गहाण टाकल्यासारखे आहे. महाआघाडीला मदत करायची की महायुतीला, याचा निर्णय मी तुमच्या पारड्यात टाकतोय. तुम्हीच निवाडा करायचा आहे, असे म्हणत आ. गोरे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हात वर करुन कोणाचे काम करायचे याचा कौल मागितला. यावेळी उपस्थित समुदायाने हात वर करुन फक्त महायुतीचेच काम करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आ. जयकुमार गोरे यांनी तुमचा निर्णय तो माझा निर्णय, असे म्हणत माढा लोकसभेला महायुतीचेच काम करणार असल्याचा निर्धार केला. यावेळी कार्यक्रम सुरु असताना महायुतीचे माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, उत्तमराव जानकर, करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांची कार्यकर्त्यांसह मेळाव्यात आगमन झाल्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. यावेळी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे भाषण झाले. ते म्हणाले, माझे आणि जयकुमार गोरे यांचे मैत्रीचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. असे असताना आज आपण माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. माढ्यातून निवडून आल्यानंतर माण-खटावमधील पाण्याचा तसेच प्रलंबित प्रश्न सोडविण्यास मी प्राधान्य देणार आहे. मी म्हणजे जयाभाऊ आणि जयाभाऊ म्हणजे मी. त्यामुळे माण-खटावला आगामी काळात कधी अंतर देणार नाही, अशी ग्वाही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली. दरम्यान, या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
जयकुमार गोरेंच्या डी.पी.वर राहुल गांधी
सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपमधून माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे घनिष्ट मित्र व माण-खटावे आमदार जयकुमार गोरेही भाजपमध्ये जाणार, अशी अटकळ बांधली गेली होती. परंतू काल झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात जयकुमार गोरे यांनी मी कॉंग्रेस सोडून कोठेही जाणार नाही, मी कालही, आजही आणि उद्याही कॉंग्रेसमध्येच असणार आहे. माढा लोकसभेला रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना मदत करण्याचा निर्णय फक्त राष्ट्रवादीने माझ्यावर केलेल्या अन्यायामुळे तुम्ही व मी घेतलेला आहे, असे सांगितले. दरम्यान आ. गोरे यांच्या व्हॉटसऍप डी.पी. वर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा फोटो असल्यामुळे जयकुमार गोरे यांच्या भाजप प्रवेशाच्या अटकळीला मात्र पूर्णविराम मिळाला आहे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |