04:09pm | May 11, 2019 |
सातारा : राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी व जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त दरवर्षी सातार्यात न चुकता हजेरी लावतात. रयत शिक्षण संस्थेचे संघटन तसेच आढावा बैठक ते घेत असतात. शरद पवार सातार्यात आल्यानंतर ते काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असते. परवा म्हणजेच 9 मे ला पवार सातार्यात आले होते. घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘घड्याळाला दाबलेले मत, कमळाला जाते’ अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. सातार्यातील या वक्तव्यामुळे मात्र राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.
भारत देश हा क्रिकेटवेडा आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. क्रिकेटला धर्म मानणारेही कमी नाहीत. राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी संरक्षणमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री अशा विविध पदांवर राहिलेल्या राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवारांचे क्रिकेट प्रेम (?) सर्वश्रुत आहे. भारतात क्रिकेटच्या माध्यमातून होणारी उलाढाल अब्जावधींच्या घरात आहे. साहजिकच क्रिकेटसारखा खेळ आपल्या खिशात असणे म्हणजे ‘सर्वकाही’ पायाशी लोळण घेत असते. भारतीय क्रिकेटवर शरद पवारांची पक्की मांड आहे. भारतीय क्रिकेटमधील कस्पटही पवारांच्या आदेशाशिवाय हलत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदही तेवढेच महत्त्वाचे आहे. मुंबई क्रिकेट अध्यक्षपद भूषविल्यानंतर थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्या अध्यक्षपदापर्यंत झेप घेता येते. मात्र, त्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद ताब्यात असणे महत्त्वाचे असते. शरद पवार यांचे मूळ गाव बारामती तालुक्यातील काटेवाडी असले तरी त्यांचे संपूर्ण कुटूंब बारामती शहरातील आमराई परिसरात वास्तव्यास आहे. गेली अनेक वर्षे शरद पवारांची मतदान नोंदणी बारामती शहरातच होती. मात्र, शरद पवारांनी क्रिकेटच्या राजकारणात 'रस' घेतल्यानंतर त्यांनी आपले मतदान यादीतील नाव बारामतीतून कमी करुन दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरात असलेल्या घराच्या पत्त्यावर बदलून घेतले. तेव्हापासून गेली अनेक वर्षे शरद पवार विधानसभा, लोकसभा व मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदान ओळखपत्र क्रमांक आयएसडी 4500021 व मतदाता क्रमांक 401 याद्वारे बीपीके सहकारी विद्यामंदिर याठिकाणी ते मतदान करतात. शरद पवारांचे वास्तव्य असलेला मलबार हिल हा परिसर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. तर मलबार हिल 185 हा विधानसभा मतदारसंघात येतो.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून यावेळी शिवसेनेचे अरविंद सावंत व कॉंग्रेसचे नवनिर्वाचित मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांच्यामध्ये थेट लढत आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या जागावाटपात हा मतदारसंघ कॉंग्रेससाठी सोडण्यात आलेला आहे. 1999 साली झालेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीनंतर हा मतदारसंघ कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. परंतू 2014 साली शिवसेनेचे अरविंद सावंत या मतदारसंघातून निवडून आले होते. यावेळीही याठिकाणाहून कॉंग्रेसचे मिलिंद देवरा उभे होते. निश्चितच आघाडीधर्म पाळत असताना एक मतदार म्हणून शरद पवारांनी कॉंग्रेसच्या उमेदवारालाच मतदान केले असावे. (?) शरद पवारांचे मतदान जर दक्षिण मुंबई मतदारसंघात असेल आणि त्याठिकाणी कॉंग्रेसचा उमेदवार असेल तर त्याठिकाणी कॉंग्रेसचे चिन्ह असलेला हाताचा पंजा असायला हवा. मग त्याठिकाणी शरद पवारांच्या म्हणण्यानुसार घड्याळ आलेच कसे? आणि त्याठिकाणी तर कमळाचा उमेदवारच नव्हता, त्याठिकाणी शिवसेनेचा धनुष्यबाण होता. मग सातार्यात शरद पवारांनी केलेला दावा खरा की खोटा, याचे उत्तर आता शरद पवार यांनाच माहित असावे. हा दावा शरद पवारांनी मी स्वत: घड्याळाचे बटण दाबले आणि मत गेले कमळाला, असा होता.
क्रिकेटमधील वर्चस्वपायी पवारांनी आपले मतदान मुंबई हस्तांतरीत केले. मात्र, बोलण्याच्या ओघात शरद पवारांना आपल्या दक्षिण मुंबई मतदारसंघातून नक्की कोण उभे होते, याचा विसर पडला असावा. अनेकांना पवारांचे मतदान मुंबईत आहे, हे माहित नसावे. पवार म्हटले की बारामती, आणि बारामती म्हटले की पवार, असे समीकरण महाराष्ट्रात रुजलेले आहे. परंतू असे असतानाही पवारांनी क्रिकेटवरील वर्चस्वासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन ताब्यात ठेवण्यासाठी घटनेच्या नियमाप्रमाणे आपले मतदान जाणीवपूर्वक मुंबईमध्ये ठेवले आहे. परंतू सातार्यात पत्रकार परिषदेत बोलताना ‘घड्याळाचे बटण दाबले तरी, कमळाला मत जाते’, असे विधान करुन खळबळ उडवून दिली होती. मात्र सोशल मीडियाच्या जमान्यात काही लपून राहत नाही. दूध का दूध आणि पाणी का पाणी क्षणात होते. महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे, याचेच हे एक द्योतक मानावे लागेल.
- संग्राम निकाळजे
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |