पाटण : कोयनानगर येथे आर्थिक व्यवहारावरून सेंट्रिंग व्यवसाय करणार्या 41 वर्षीय मजुराचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद कोयनानगर पोलिस ठाण्यात झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
श्रीकांत सुभाष चव्हाण (वय 41, रा. कोयनानगर, मूळ रा. विजापूर कर्नाटक) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत कोयनानगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी (दि. 21) कोयनानगर येथील तीन मंदिराच्या पाठीमागे हेळवाक रस्त्यालगत नाल्यात श्रीकांत चव्हाण याचा मृतदेह आढळला होता.
पोलिसांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात केली. त्यावेळी श्रीकांत चव्हाण याचा गळा दाबून खून झाल्याचे समोर आले. हवालदार संजय चव्हाण यांनी कोयनानगर पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली आहे.
श्रीकांत चव्हाण हा मूळचा विजापूर (कर्नाटक) नमानतांडा येथील असून गेल्या काही वर्षांपासून तो कोयनानगर येथे सेंट्रींग व्यवसाय करीत होता. दोन महिन्यांपूर्वीच त्याच्या पत्नीचे निधन झाल्याने चव्हाण आपल्या आई आणि मुलांना घेऊन कर्नाटकला गेला होता. मात्र, शनिवारी अचानक त्याचा मृतदेह आढळला आणि रविवारी त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले.
दरम्यान, मयत श्रीकांत चव्हाण याचा खून आर्थिक व्यवहारातून झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयानी व्यक्त केला आहे. त्यानुसार कोयनानगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास स.पो.नि. महेश भावीकट्टे करीत आहेत.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |