04:13pm | Dec 10, 2019 |
सातारा : सातारा पोलीस दलाच्यावतीने आज निर्भया रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तालीम संघ मैदान ते जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहापर्यंत निर्भया रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरवात केली. या रॅलीत हजारो युवती-विद्यार्थीनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
देशात घडत असलेल्या महिला व मुलींवरील अत्याचाराच्या अनुषंगाने देशातील प्रत्येक युवतीने निर्भयपणे वाईट प्रवृत्तींशी दोन हात करण्यासाठी स्वयंपूर्ण बनले पाहिजे. त्यासाठी प्रथम प्रत्येक युवती-महिलेला मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाने एक पाऊल पुढे येत आज दि. 10 रोजी सातार्यात निर्भया रॅलीचे आयोजन केले होते.
‘जो करेल स्त्रीचा अपमान, निर्भया वाकवेल त्याची मान’ या टॅग लाईनद्वारे महिलांवर तसेच युवतींवर हात टाकणार्या टवाळखोरांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत युवतींसह विद्यार्थीनींनी या रॅलीला उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी तेजस्वी सातपुते यांनी उपस्थित युवती-विद्यार्थीनींना संकटसमयी स्वत:चे संरक्षण कसे करावे, याबाबतचे मार्गदर्शन केले. यावेळी तमन्ना नावाच्या युवतीने एखादा व्यक्ती वाईट भावनेने जर तुमच्यावर जबरदस्ती करत असेल तर स्वत:चा बचाव करुन संबंधितावर कशाप्रकारे हल्ला करावा, याचे प्रात्यक्षिक तमन्ना हिने यावेळी दाखवले. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |