02:42am | Mar 25, 2020 |
सातारा : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कालच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळपासूनच राज्यात लॉक डाऊन केला होता. त्यानंतर आज संध्याकाळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात लॉक डाऊनचे आवाहन केल्यानंतर जिवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी उघड्या असणार्या किराणा मालाच्या दुकानांवर सातार्यातील नागरिकांची अक्षरश: झुंबड उडाली. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी किराणा दुकानांवर गर्दी न करता जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्याबाबत सातारकरांना सबुरीचा सल्ला दिला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी देशाला संबोधित करीत आज मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केला आहे. पंतप्रधानांच्या अभिभाषणानंतर सातार्यातील जनता सैराट झाली. आता उद्यापासून जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठाच होणार नाही, अशा मानसिकतेमुळे अबालवृद्धांनी सातार्यातील ठिकठिकाणच्या किराणा मालाच्या दुकानांवर अक्षरश: झुंबड उडवली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना जिल्हावासियांना करीत आहे. कालच जिल्हा प्रशासनाने 144 कलमान्वये जिल्हाभरात संचार व जमावबंदी आदेश पारित केलेला आहे. असे असतानाही सातारा शहरातील लोकांनी कशाचीच तमा न बाळगता झुंडशाहीचे दर्शन आज संध्याकाळी घडवले, ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी विनाकारण किराणा मालाच्या दुकानावर गर्दी टाळण्याचे आवाहन करीत जरी देशभरात लॉक डाऊन झाला असला तरी 15 एप्रिलपर्यंत मेडिकल, किराणा मालाच्या दुकानांमध्ये किमान दोन महिने पुरेल एवढा साठा आहे, असेही सांगितले आहे. तसेच आज दुपारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याबरोबर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी किराणा माल, मेडिकल, दूध विक्रेते तसेच इतर जिवनावश्यक वस्तूंची विक्री करणार्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीमध्ये संबंधितांना सूचना करण्यात आल्या असून जिवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी येणार्या ग्राहकांनी दुकानांमध्ये गर्दी करु नये, ग्राहकांमध्ये किमान एक मीटरचे अंतर असावे, विनाकारण औषधे, अन्नधान्य साठा करणार्यांबाबत सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज संध्याकाळी पंतप्रधानांच्या अभिभाषणानंतर सातार्यात जो काही प्रकार घडला, तो भविष्यात उद्भवू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोशल मीडियाद्वारे आपली ऑडिओ क्लिप प्रसारित करुन जिल्ह्यातील नागरिकांना मार्गदर्शन केले आहे. तसेच या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |