कराड : बांधकाम व्यवसायिकाला खंडणी मागून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या हेतूने हातात तलवारी घेऊन दहशत माजवल्याची घटना दोन महिन्यापूर्वी घडली होती. याप्रकरणातील फरार संशयितास कराड शहर पोलिसांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली असून त्याला येथील अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रशांत उर्फ परशुराम करवले असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बांधकाम व्यवसायिकास अभिनंदन रतन झेंडे, प्रतिक चव्हाण उर्फ बबल्या, पवन सोळवंडे, अविनाश काटे, प्रशांत करवले यांनी आपआपसात संगणमत करून गैरकायदा जमाव जमवून हातात तलावारी घेऊन त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याच्या हेतूने हातात तलवारी घेऊन दहशत माजवल्याप्रकरणी बांधकाम व्यवसायिकाने कराड शहर पोलिसात फिर्याद दिली होती. याप्रकरणी पाचजणांवर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर प्रतिक चव्हाण यास पोलिसांनी अटक केली. खंडणीप्रकरणाच्या दुसर्या दिवशी पवन सोळवंडे याची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. अभिनंदन रतन झेंडे हा आग्रा पोलिसांच्या ताब्यात आहे. प्रशांत करवले व अविनाश काटे हे दोघे संशयित फरार होते. बुधवारी रात्री प्रितीसंगम घाटावरील पसिरात प्रशांत करवले हा फिरत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रशांत करवले याला अटक केली. त्याने खंडणीच्या गुन्ह्यात वापरलेली तलवार ही पोलिसांनी जप्त केली असून त्याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |