कराड : झोपी गेलेल्या साखर कारखानदारांना जागे करण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेने आज (गुरूवारी) सहयाद्रि सहकारी साखर कारखाना व यशंवतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासमोर ढोल ताशा आंदोलन केले. बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
साखर कारखाने सुरू होवून दोन महिने झाले. मात्र आजअखेर शेतकर्यांना ऊसाचे बिल मिळाले नाही. ऊस गाळप झाल्यानंतर 14 दिवसात एफआरपी देणे कायद्यानुसार कारखानदारांना बंधनकारक आहे. तरीसुद्धा अद्याप शेतकर्यांना ऊसाची बीले दिली नाहीत. जिल्हाधिकार्यांनी घेेतलेल्या बैठकीत आपल्या कारखान्यांच्या प्रतिनिधीनी एकरक्कमी एफआरपी चौदा दिवसात देण्याचे मान्य केले होते. आज शेतकर्यांसमोर शेकडो समस्या उभ्या आहेेत. अशा वेळेला आपण शेतकर्याला त्यांच्या हक्काचे ऊस बील वेळेत दिले तरच त्यांचे काही प्रश्न सुटणार आहेत. यासाठी कारखान्यांनी आजपर्यंत आलेल्या ऊसाचे बील एफआरपीप्रमाणे एकरक्कमी कोणतीही कपात न करता शेतकर्यंाना त्यांच्या बँक खात्यात जमा करावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने कारखान्यांना केली आहे. यावेळी झोपी गेलेल्या साखर कारखानदारांना जागे करण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहयाद्रि सहकारी साखर कारखाना व य.मो. कृष्णा साखर कारखान्यासमोर ढोल ताशा आंदोलन केले.व याबाबतचे निवेदन कारखाना प्रशासनांकडे देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, बी.जी.पाटील, उत्तम खबाले, सुनिल कोळी, जे.एस.पाटील, सुरेश मोरे, विश्वास जाधव, ज्ञानदेव साळुंखे, सागर कांबळे, विशाल कसबे, अशोक यादव, रामचंद्र मोरे, विक्रम थोरात आदी पदाधिकारी व शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |