सातारा : शाहू चौक ते चार भिंती दरम्यानच्या मार्गावर हरिजन गिरिजन सोसायटीच्या लगत एका घराच्या शेडसह किराणा मालाचे दुकान व पिठाच्या गिरणीवर दरड कोसळून मोठे नुकसान झाले. ही घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान घडल्याचे वृत्त आहे. इंतजा इनामदार (रा. 51) रा.केसरकर पेठ, या महिलेच्या व्यवसायाचे नुकसान झाल्याने उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
रविवारी सकाळी नगराध्यक्ष माधवी कदम व उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. नगरपालिकेने तातडीने यंत्रणा लावून जेसीबी व टिपरच्या सहाय्याने मातीचा भराव हटवण्यात आला. हरीजन गिरीजन सोसायटीच्या लगत डोंगराच्या पायथ्याला इंतजा इनामदार यांच्या घरासह किराणा मालाचे दुकान व पिठाची गिरणी आहे. साताऱ्यात गेल्या काही दिवसापासून पाऊस सुरू झाल्याने चार भिंतीलगतच्या डोंगरावरून पाण्याबरोबर माती घसरायला सुरवात झाली होती. मात्र त्याकडे पालिका प्रशासनाने फारसे गांभीर्याने पाहीले नाही. मात्र शनिवारी रात्री पावसाची रिमझिम सुरू असताना साडेदहाच्या दरम्यान मातीचा मोठा भराव इनामदार यांच्या दुकान व पिठाच्या गिरणीवर जोरात कोसळला. काही क्षणातच घराचे समोरचे शेड व त्यांच्या दुकानाचे होत्याचे नव्हते . सुदैवाने दुकानात कोणी नसल्याने जीवित हानी टळली. भराव कोसळताच इनामदार कुटुबीयांनी घराच्या मागच्या दरवाजाने बाहेर धाव घेतली, घटनास्थळी मोठा आवाज झाल्याने याठिकाणी बघ्यांची गर्दी सुरू झाली. मात्र अंधारामुळे बचाव कार्य करता आले नाही. आज सकाळी नगराध्यक्षा माधवी कदम व उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या सूचनेनेतर शहर विकास विभागाची यंत्रणा जेसीबी व टिपरसह घटनास्थळी दाखल झाली. पाच ते सहा ट्रक माती यावेळी हटवण्यात आली. बोगदा ते केसरकर पेठ ( चार भिंती ) या दीड किलोमीटरच्या टप्प्यात सुमारे चार ते पाच हजार घरे ही अगदीच डोंगराच्या लगत आहेत. चार भिंती परिसरातील नागरी वस्त्यांचे डोंगर कपारीत अतिक्रमण झाले आहे. अशा धोकादायक वस्त्यांचे तातडीने सर्वेक्षण करणे गरजेचे बनले आहे. धोकादायक क्षेत्रात आत्तापर्यंत धस कॉलनी व माची पेठ येथे संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. आज घडलेल्या घटनेमुळे ऐकूणच साताऱ्यात उंच व सखल वस्त्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |