04:17pm | Dec 04, 2018 |
सातारा : पुरोगामी महाराष्ट्रामध्ये गोर-गरीब मुलांना शहरात जावून शिक्षण घेण्यासाठी सुविधा नव्हत्या. याचा विचार करून शासनाने समाज कल्याण विभागामार्फत शाळा, महाविद्यालय, वस्तीगृह यांची निर्मिती केली. लाखो मुलांना जगण्याचा हक्क मिळाला. परंतु सातारा शहरात असलेल्या सदरबझार येथील समाज कल्याण विभागाचे वस्तीगृह म्हणजे अधिकार्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. खेड्यातून आलेल्या मुलांना निकृष्ठ जेवण तर बार्टीच्या पुस्तकांना वाळवी लागल्याचे निदर्शनास आले आहे. मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्या चहापानाचा खर्चावर डल्ला मारणार्या या अधिकार्यांनी निदान वस्तीगृहातील मुलांना चांगले दर्जाच्या सुविधा व जेवण द्यावे अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीचे नेते विजय गायकवाड व माजी पंचायत समिती सदस्य प्रविण धस्के यांनी केली आहे.
सातारा शहरात 15 वर्षापुर्वी सदर बझार याठिकाणी समाज कल्याण विभागाने मुली व मुलांसाठी वस्तीगृह उभे केले आहे. या ठिकाणी सुमारे 150 विद्यार्थी निवास व शिक्षण घेत आहेत. आज मंगळवार दि. 4 डिसेंबर सामाजिक कार्यकर्ते प्रविण धस्के यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेवून या वस्तीगृहाची पहाणी केली. त्यावेळी विदारक चित्र समोर आले. वस्तीगृहाच्या खिडकीच्या तावदाच्या काचा तुटल्या आहेत. गेल्या चार महिन्यापासून येथील व्यायाम शाळा बंद आहे. बार्टी विभागाच्या पुस्तकांची रद्दी या व्यायामशाळेत व इमारतीच्या टेरीवर ठेवण्यात आली आहे. निकृष्ठ दर्जाचे जेवण असल्याने मुलांच्या प्रकृतीवर याचा परीणाम होत आहे. मुदत संपलेले खाद्य पदार्थ देवून त्याच्या आरोग्याशी हे अधिकारी खेळत आहेत.
एका बड्या नेत्याने समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहाने जेवण पुरविण्याचा ठेका घेतला आहे. त्या ठेक्याची मुदत संपल्यामुळे सद्या अन्य ठिकाणावरून जेवण मागविले जात आहे. दर महिन्याला येथील अधिकार्यांना 15 ते 20 हजार रूपये कमीशनचा मलिदा मिळत आहे. हे अधिकारी या वस्तीगृहातील पाणी सुध्दा पित नाहीत पण त्यांच्या घरी तुप, ड्रायफुट, फळे नियमीतपणे घरपोच होत असतात. अशा भ्रष्टाचारी अधिकार्यांना मंत्री व वरीष्ठ अधिकार्यांचे सातार्यातील दौरे म्हणजे, दिवाळीचा ‘बोनस’ झाल्याचा आनंद वाटत असतो. अशा दौर्यावेळी विद्यार्थ्यांचे खुपच हाल होत असतात. सकाळी 9 ते 11 व सायंकाळी 6.30 ते 7 अशी जेवणाची वेळ असली तरी जोपर्यंत बाहेरून जेवण येत नाही, तोपर्यत मुलांना जेवणाची चातकाप्रमाणे वाट पहावी लागते. थंडगार व निकृष्ठ दर्जाचे अन्न पोटातील भुकेची आग सहन करीत आहे. मात्र येथील अधिकारी व त्यांच्या नातेवाईकांच्या प्रकृतीकडे पहाता त्यांना नेमका कोणता खुराक? आहे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. या वस्तीगृहाची स्वत: पालकमंत्री ना. विजय शिवतारे व जिल्हाधिकरी श्वेता सिंघल यांनी मानवतेच्या भावनेतून पहाणी करून या गरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी वस्तीगृहातील यातना सोसणार्या मुलांनी केली आहे.
वस्तीगृह दुरावस्थेच्या पहाणीवेळी शिरवळचे संतोष मोहिते, अजित जगताप यांच्यासह आदि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. समाजकल्याण मंत्री सातारा दौर्यावर आल्यानंतर अधिकार्यांना सुचना करणारे एकही कार्यकर्ते या पहाणीवेळी उपस्थितीत नव्हते, याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |