02:31am | Nov 20, 2019 |
सातारा : ग्वाल्हेर बेंगलोर आशियाई महामार्गसह सेवा रस्त्यांची रस्ते मानकांप्रमाणे येत्या पंधरा दिवसात दुरूस्ती करण्यात यावी अन्यथा सोळाव्या दिवशी महामार्गावर टोल बंद आंदोलन राबवण्यात येईल असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी राष्ट्रीय महामार्ग रस्ते प्राधिकरणाच्या बोलवलेल्या बैठकीत ठेकेदाराला तातडीने महामार्गाचे कारपेटिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीला रिलायन्स इन्फ्रासह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व साताऱ्यातील तक्रारदार नागरिक यावेळी उपस्थित होते. ग्वाल्हेर बेंगलोर आशियाई महामार्ग क्रमांक ४७ हा सातारा जिल्ह्याच्या हद्दीत १२१ किलोमीटर लांबीचा आहे. आनेवाडी व तासवडे या दोन टोल नाक्यांवर ज्या प्रमाणात टोल दिला जातो त्या तुलनेत सुविधा मिळत नाही. गुळूंब- जोशी विहीर -बावधन - भुईज - आनेवाडी - लिंब- खिंडवाडी - शेंद्रे - अतित या दरम्यान महामार्गाला प्रचंड खड़डे पडल्याची तक्रार रविंद्र नलावडे यांनी बैठकीत केली.आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी महामार्गाच्या असुविधांचा मुद्दा उचलून धरत रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. ठेकेदार कंपनीकडून तक्रारीची दाद घेतली जात नाही असाही सूर बैठकीत आळवण्यात आला. रिलायन्स इन्फ्राचे प्रकल्प सचिव आर . एस . गांधी यांनी महामार्गाचे व सेवा रस्त्यांचे दर्जेदार कारपेटिंग करून देऊ असे आश्वासन दिले. मिटिंग झाली म्हणजे संपले असे नाही महामार्गाच्या कामाचा वेळोवेळी मिटिंग बोलाऊन आढावा घेतला जाईल, त्यामुळे जवाबदारीने वेळेत कामे पूर्ण करा अशा स्पष्ट कानपिचक्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी ठेकेदार कंपनीला दिल्या. महामार्गाची दुरुस्ती पंधरा दिवसात न झाल्यास सोळाव्या दिवशी टोल बंद आंदोलन करण्याचा इशारा शिवेंद्रराजे यांनी दिला.
टोलनाक्याच्या वीस किलोमीटर परिघातील गावांना सवलतीच्या दरात पास देण्याची तरतूद आहे.जी गावे या परिघात येतात त्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल या सुविधेचा सातारकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवेंद्रराजे यांनी केले. शिवाय ज्यांनी या सवलती घेतल्या आहेत त्यांची ही यादी ठेकेदारांकडून मागवल्याचे शिवेंद्र राजे यांनी स्पष्ट केले. रविंद्र नलावडे यांनी महामार्ग दुरूस्त न झाल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |