सोलापूर : साताऱ्यातील ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य प्रशिक्षक,लेखक,दिग्दर्शक तुषार भद्रे यांना सोलापूर येथील अस्तित्व मेकर्स या नाट्यसंस्थेच्यावतीने दिला जाणारा यंदाचा अस्तित्व रंगसाधक पुरस्कार जाहीर झाला असून सदर पुरस्कार २७ जुलै रोजी हुतात्मा स्मारक मंदिर सोलापूर येथे प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती अस्तित्व मेकर्स संस्थेचे अध्यक्ष प्रमोद खांडेकर यांनी दिली आहे.
या निवडी संदर्भात अधिक माहिती देताना खांडेकर यांनी सांगितले की,जो रंगकर्मी निर्व्याजवृत्तीने रंगभूमीची सेवा करून रंगभूमी समृद्ध करतो,तीन-चार दशके काम करतो अशा रंगकर्मींच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार दिला जातो.यंदाचा पुरस्कार हा तिसरा पुरस्कार असून तुषार भद्रे गेल्या चाळीस वर्षांच्या कालावधीत दर्जेदार नाट्यलेखन, दिग्दर्शन, मराठी रंगभूमीची चळवळ गतिमान ठेवण्या करिता महाराष्ट्रभर जवळपास पंचवीस हजारावर नव्या दमाच्या रंगकर्मींना अभिनय व तंत्र आणि आवाज जोपासना या विषयांवर मार्गदर्शन,प्रशिक्षण दिलेले आहे. साहित्य अकादमीची प्रवास शिष्यवृत्तीद्वारा बंगाली रंगभूमीचा अभ्यास केला तसेच फोर्ड फौंडेशन अमेरिका यांची नाट्य लेखन शिष्यवृत्ती त्यांना लाभलेली होती. ब्रिटिश ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक पीटर ब्रूक व राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे प्राचार्य बन्सी कौल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कार्यशाळेत सहभाग घेतलेला आहे. त्या बरोबरीने लोकरंगमंच सातारा, राजा शिवाजी कला अकादमी सातारा व तुषारभद्रे स्कुल ऑफ थिएटर अँड फिल्म आर्ट या संस्थानचे ते संस्थापक आहेत. रंगसाधक पुरस्कार समिती सदस्य ज्येष्ठ रंगकर्मी सुनील गुरव, सुहास मार्डीकर व नाटककार मुकुंद हिंगणे यांनी भद्रे यांच्या या गेल्या चाळीस वर्षातील भरीव योगदानाची दखल घेऊन यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड केली आहे अशी माहिती अस्तित्व महोत्सव २०१९ च्या अध्यक्षा श्रीमती शोभा बोल्ली यांनी दिली आहे. पुरस्कार वितरण सोहळा २७ जुलै रोजी सोलापूरच्या हुतात्मा स्मारक मंदिरात संपन्न होणार असून या प्रसंगी तुषार भद्रे यांनी घडवलेले मराठवाडा, कोकण विभागासह मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तुळजापूर येथील रंगकर्मी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महोत्सवाचे प्रमुख संयोजक ऍड. बसवराज सलगर यांनी दिली आहे. या पुरस्काराबद्दल तुषार भद्रे यांचे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातून अभिनंदन होत आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |