06:39pm | May 22, 2018 |
सातारा : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी नेते म्हणून अजितदादांकडे पाहिले जाते. काल जावली तालुक्यातील करहर याठिकाणी जावली बँकेचे पदाधिकारी यांचा सत्कार आयोजित केला होता. या सत्कारासाठी मोठा खर्च करुनही माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सत्कार करताना लहान शाल दिल्यामुळे अजितदादांनी संयोजकांकडे नाराजी व्यक्त केली. या नाराज नाट्यामध्येच जि. प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांना सातारा लोकसभेची राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यास मी सूचक म्हणून सही करेन, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला.
प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणार्या करहर याठिकाणी जावली बँकेचे पदाधिकारी यांचा जाहीर सत्कार व शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जि. प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जावली पंचायत समितीचे उपसभापती दत्ता गावडे, हिंदुराव तरडे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यासाठी खान-पान सेवा, भव्य मंडप तसेच हारतुरे, श्रीफळ यांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला. परंतू एका कार्यकर्त्याने नवीन शाली आणण्याऐवजी लग्नात वाटण्यात आलेली हलक्या प्रतीची लहान शाल सत्कारासाठी आणली होती. मेळाव्याची भव्यता पाहून अजितदादा खुश झाले. पण सत्काराच्यावेळी लहान शाल पाहून त्यांच्यातील स्पष्टवक्तेपणा दिसून आला. कार्यक्रमाचे आयोजन करताना चांगल्या शाली तरी आणा, अशा शब्दांत त्यांनी संयोजकांना फटकारले. कारण यापूर्वी उपमुख्यमंत्री असताना अजितदादांना खास काश्मिरवरुन आणलेली शाल देण्यात आली होती. पण आता सत्ता नसताना बागायतदार रुमाल मिळाल्यामुळे अजितदादांनी मुद्द्यालाच हात घालून नाराजी व्यक्त केली. यामुळे सत्कारमूर्तींचा चेहरासुद्धा झाकोळला गेला. याची चर्चा सध्या जावलीपासून मुंबईपर्यंत सुरु झाली आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण विक्रमी मतांनी विजयी होवू असा विश्वास मानकुमरे यांनी व्यक्त केला. याचा संदर्भ घेवून राष्ट्रवादीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मानकुमरे यांच्या अर्जावर मी सूचक होण्यास तयार आहे, असे सांगून सामान्य कुटूंबातील व्यक्ती खासदार होणार असेल तर मला आनंदच वाटेल. मानकुमरे यांनी मला साथ दिली आहे, असेही स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला नियोजित वेळेत अजितदादा उपस्थित राहिले, पण मेळाव्यात गर्दी कमी असल्यामुळे काहीवेळ त्यांना करहर याठिकाणी थांबावे लागले होते. या कार्यक्रमासाठी जावली बँकेचे संचालक, कर्जदार, कर्मचारी व ग्रामस्थ यांनी नियोजित वेळ टळून गेल्यानंतर चांगलीच गर्दी केली होती.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |