04:21am | Jun 06, 2019 |
सातारा : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ड्रोंगो या पर्यावरणवादी संस्थेने आज ३०० सातारकर कुटुंबांना मोफत रोपांचे वाटप केले. या रोपांची लागवड करुन त्याचे जीवापाड संगोपन करु, असा निर्धार नागरिकांनी यावेळी केला.
विशेष म्हणजे ‘ड्रोंगो’ लाभार्थ्यांकडून वेळोवेळी आढावा घेऊन या रोपांच्या वाढीवर लक्ष ठेवणार आहे. सातारा वन विभाग व सामाजिक वनीकरण या विभागांच्या सहकार्याने मोफत रोप वाटपाचा कार्यक्रम गुरूवार पेठेतील छत्रपती शाहू उद्यानात झाला. ‘ड्रोंगो’कडे पुर्वनोंदणी केलेल्या आंबा, पेरु, कदंब, वड-पिंपळ, कडूलिंब, गुलमोहर, जारुळ, कडीपत्ता, लिंबू आदी प्रजातींच्या ३०० रोपांचे वाटप करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला एकच रोप या तत्वावर ही रोपे देण्यात आली.
तापमान वाढीचे परिणाम सातारकर या उन्हाळ्यात अधिक प्रकर्षाने अनुभवत आहेत. वृक्षारोपण आणि संगोपन हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे हरित सातारा या उपक्रमात लोकसहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे ड्रोंगोतर्फे शैलेंद्र पाटील यांनी सांगितले. गुरुवार बागेतच वृक्षारोपण करुन उपक्रमाचे उद्घाटन वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, सामाजिक वनीकरण विभागाचे संचालक साल विठ्ठल, विनायकराव आगाशे, माजी नगरसेवक डॉ. रवींद्र भारती (झुटींग), मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे, वनक्षेत्रपाल शितल राठोड, ड्रोंगोचे अध्यक्ष सुधीर सुकाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी ॲड, सिमंतीनी नूलकर, जयंत देशपांडे, रोहित घाडगे, आनंद गुरव, यशवंत घोरपडे, विजयकुमार निंबाळकर तसेच ड्रोगो संस्थेचे सागर पारखे, शैलेन्द्र पाटील, प्रसाद देवळेकर, राजेश नारकर, ॲड. सचिन तिरोडकर, मनोहर शिवतारे, निखील वाघ, हरिविजय बाबर आदी उपस्थित होते.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |